शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

घर कोसळले; दोन दिवस उलटूनही पंचनामा नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:15 IST

खेट्री : पातूर तालुक्यातील चांगेफळ येथे पावसामुळे घर कोसळल्याने संसार उघड्यावर आला आहे; मात्र असे असतानाही दोन दिवस उलटूनही ...

खेट्री : पातूर तालुक्यातील चांगेफळ येथे पावसामुळे घर कोसळल्याने संसार उघड्यावर आला आहे; मात्र असे असतानाही दोन दिवस उलटूनही अद्यापपर्यंत पंचनामा केला नसल्याचा प्रकार घडला आहे.

चांगेफळ येथील नर्बदा दुर्यधन मेहेंगे घरात झोपलेल्या असताना मंगळवारी १३ जुलै रोजीच्या मध्यरात्री परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने अचानक घर कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी घडली नाही. गेल्या तीन ते चार दिवसांपासून सतत पावसामुळे दगड-मातीच्या भिंतीमध्ये पाणी मुरल्याने घर कोसळल्याची घटना घडली आहे. यापूर्वीही गतवर्षी याच महिलेचे घर कोसळले होते; पंचनामाही करण्यात आला होता, परंतु शासनाकडून आतापर्यंत आर्थिक मदत मिळाली नाही. या वर्षीसुद्धा घर कोसळल्याने महिलेचा संसार पुन्हा उघड्यावर आला आहे. यंदा दोन दिवस उलटूनही पंचनामा केला नसल्याचे समोर आले आहे.

-------------------------------------

पावसामुळे घर कोसळल्याने संसार उघड्यावर आला आहे. दोन दिवस उलटूनही पंचनामा करण्यासाठी कुणीच फिरकले नाही. मागच्या वर्षीसुद्धा घर कोसळले होते, परंतु आतापर्यंत आर्थिक मदत मिळाली नाही. मागील वर्षी घर कोसळल्याने व्याजाने पैसे घेऊन घर बांधले होते. घर कोसळल्याने पुन्हा संसार उघड्यावर आला आहे.

-नर्बदा दुर्यधन मेहेंगे, महिला, चांगेफळ

150721\4449img-20210714-wa0051.jpg~150721\4449img-20210714-wa0051.jpg

photo~photo