शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

डाबकी रेल्वेगेटवर तासभर ‘ट्रॅफिक ज्ॉम'

By admin | Updated: January 10, 2017 02:23 IST

छोट्या वाहनधारकांचा आततायीपणामुळे वाहतुक विस्कळीत झाली होती.

अकोला, दि. ९- अकोल्यातून शेगाव, तेल्हारा, जळगाव जामोदकडे जाणार्‍या एकमेव मार्गावरील डाबकी रेल्वेगेटजवळ सोमवारी सकाळी ११ वाजता तब्बल तासभर ट्रॅफिक ज्ॉमचा सामना वाहनधारकांना करावा लागला. गेटपासून भौरदकडे जाणार्‍या रस्त्यावर जवळपास एक किलोमीटरपर्यंंत वाहनांच्या रांगा लागल्या. छोट्या वाहनधारकांच्या आततायीपणामुळे जड वाहनांचा मार्ग अडतो, त्यामुळे याठिकाणी ही समस्या सातत्याने उद्भवत आहे. अकोला शहरातून शेगावकडे जाणार्‍या सर्वच वाहनांची गर्दी या रस्त्यावर असते. विशेषत: चतुर्थी आणि एकादशीला दुचाकी आणि छोट्या चारचाकी गाड्या, छोट्या-मोठय़ा पालख्यांनी हा रस्ता गजबजलेला असतो. सोमवारी एकादशी असल्याने शेगावकडे जाणार्‍या वाहनधारकांची गर्दी प्रचंड होती. त्याचवेळी आठवड्यातील पहिला दिवस म्हणून ग्रामीण भागातून येणार्‍यांची वाहनेही मोठय़ा प्रमाणात होती. सकाळी ११.१५ वाजता या सर्व वाहनधारकांची गर्दी रेल्वेगेट बंद असल्याने तेथे झाली. गेट उघडल्यानंतर सर्वांंनी आपलेच वाहन दामटण्याची घाई केली. त्या घाईत भौरदच्या दिशेने जाणार्‍या जड वाहनासमोर काही दुचाकी, चारचाकी गाड्या आल्या. गर्दी एवढी झाली की कोणतेही वाहन जागचे हलवणेही कठीण झाले. त्यातच दुसरी रेल्वेगाडी येण्याची सूचना मिळाली. गेटमनने गेट बंद करण्यासाठी एकच हल्लकल्लोळ केला. कसाबसा रेल्वे मार्ग मोकळा झाला. गेट बंद करण्यात आला. या काळात पारसकडे जाणार्‍या दोन, अकोलाकडे जाणारी एक रेल्वेगाडी निघून गेली. त्यानंतर गेट उघडण्यात आले. काहींनी स्वयंस्फूर्तपणे वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर तब्बल तासाभराने या ट्रॅफिक ज्ॉममधून सुटका झाली.