शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
6
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
7
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
8
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
9
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
10
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
11
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
12
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
13
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
14
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
15
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
16
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
17
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
18
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
19
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
20
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या

आकाशच्या फटकेबाजीने यजमान नागपूर पराभूत

By admin | Updated: May 27, 2014 19:24 IST

अकोला संघाने गाठली उपान्त्यफेरी समीर डोईफोडेने टिपले ६ गडी

अकोला: विदर्भ क्रिकेट असोसिएशन अंतर्गत नागपूर येथे आयोजित १३ वर्षाखालील शरद भाके स्मृती टी-३० स्पर्धेतील सोमवार २६ मे रोजी झालेल्या सामन्यात अकोला जिमखाना संघाने यजमान शरद भाके क्रिकेट अकादमी, नागपूर संघाचा तब्बल २० धावांनी पराभव करून उपान्त्यफेरी गाठली. मध्यमगती अष्टपैलू खेळाडू आकाश राऊत याने बहारदार फलंदाजीचे प्रदर्शन करीत २३ चेंडूत २६ धावा काढून संघाला स्पर्धेत सलग तिसरा विजय मिळवून दिला.प्रताप नगर चौक मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात अकोला संघाने २८ षटकात सर्वबाद १०३ धावा काढल्या. यामध्ये आकाश राऊतच्या २३ चेंडूत २६ धावा, श्यामलच्या १३, मितेश भारूकाच्या १२ धावांचा समावेश आहे. नागपूर संघाकडून निखिल कर्णिक याने ४, प्रियांशू गांगुली याने २ तर यश मठाणी, मेहुल रायकर आणि जय कडबे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.यजमान शरद भाके अकादमी नागपूर संघ १०४ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरला. अकोला संघाचा कर्णधार समीर डोईफोडे याच्या भेदक गोलंदाजीने ६ बळी घेतल्याने नागपूर संघ पुरता साफ झाला. नागपूर संघाच्या प्रियांशू गांगुली याने २१, श्रेयश गांगुली याच्या १६ वगळता अन्य एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या उभारू शकला नाही. समीर डोईफोडे याने ६, सयाजी देशमुख याने २ आणि श्यामल निखाडे याने १ गडी बाद केला.दरम्यान, बलाढ्य प्रवीण हिंगणीकर अकादमी, नागपूर आणि अकोला जिमखाना संघाने तीन-तीन सामने जिंकले; परंतु गुणांच्या आधारावर आघाडी घेत अकोला संघाने उपान्त्यफेरीत प्रवेश केला; मात्र प्रवीण हिंगणीकर संघाला स्पर्धेबाहेर व्हावे लागले. अकोला संघ प्रशिक्षक माजी रणजीपटू संतोष देशमुख यांच्या मार्गदर्शनात कामगिरी करीत आहे. संघ व्यवस्थापक कृष्णा टापरे आहेत.