शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयास आग; बेबी केअर युनिट जळाले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 01:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गांधी मार्गावरील एका बालरुग्णालातील बेबी केअर युनिटमध्ये शार्ट सर्किटमुळे आग लागून, फोटो थेरपी मशीन जळून खाक झाल्याची घटना सोमवारी पहाटे ४ वाजताचे दरम्यान घडली. आग लागल्याचे लगेच लक्षात आल्यामुळे कोणतीही प्राणहानी झाली नाही.बालरोग तज्ज्ञ डॉ. विनायक देशमुख यांचे गांधी मार्गावर बाल रुग्णालय आहे. या रुग्णालयातील  बेबी ...

ठळक मुद्देलगेच लक्षात आल्याने प्राणहानी टळली!फोटो थेरपी मशीन जळून खाक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गांधी मार्गावरील एका बालरुग्णालातील बेबी केअर युनिटमध्ये शार्ट सर्किटमुळे आग लागून, फोटो थेरपी मशीन जळून खाक झाल्याची घटना सोमवारी पहाटे ४ वाजताचे दरम्यान घडली. आग लागल्याचे लगेच लक्षात आल्यामुळे कोणतीही प्राणहानी झाली नाही.बालरोग तज्ज्ञ डॉ. विनायक देशमुख यांचे गांधी मार्गावर बाल रुग्णालय आहे. या रुग्णालयातील  बेबी केअर युनिटमध्ये सोमवारी पहाटे ४ वाजताचे सुमारास अचानक झालेल्या शॉट सर्किटमुळे आग लागली. बेबी केअर युनिटमधून धूर व वास येत असल्याचे कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेच्या लक्षात आले. सदर परिचारिकेने याबाबत तातडीने डॉक्टरांना माहिती दिली. यावेळी उपस्थित असलेल्या कर्मचार्‍यांनी समयसूचकता दाखवून वीज पुरवठा खंडित केला. त्यानंतर तातडीने आगीबाबत अग्निशमन दलाला कळविण्यात आले. आग लागली त्यावेळी बेबी केअर युनिटमध्ये दाखल असलेले दोन्ही बाळ त्यांच्या आईजवळ असल्याने कोणाला काही झाले नसल्याचे डॉ. विनायक देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी फायर सिलिंडरद्वारा बेबी केअर युनिटमधील आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत फोटो थेरपी मशीन जळून खाक झाली असून, बेबी केअर युनिटचेही नुकसान झाले आहे. यावेळी रुग्णालयात दाखल असलेल्या १0 ते १२ रुग्णांना तत्काळ दुसर्‍या दवाखान्यात हलविण्यात आले असून, त्यांना कोणतीही झळ पोहोचली नसल्याचे डॉ. विनायक देशमुख यांनी सांगितले. -