शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
3
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
4
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
5
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
6
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
7
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
8
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
9
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
10
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
11
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
12
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
13
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
14
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
15
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
16
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
17
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
18
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
19
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
20
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार

फळबागांचे अतोनात नुकसान

By admin | Updated: April 15, 2015 01:40 IST

अकोला जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल ; केळी, आंबा, पपई, सत्रा, डाळिंब पिकांना फटका.

अकोला: जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील फळबागा उद्ध्वस्त झाल्या. केळी, आंबा, संत्रा, पपई, टरबूज, डाळिंब पिकांचे अतोनात नुकसान झाले. गतवर्षी मार्च महिन्यात गारपिटीचा फटका फळबागांना बसला होता. त्यानंतर अल्प आणि अनियमित पाऊस पडल्याने खरीप हंगामातील पिकं समाधानकारक झाली नाहीत. कपाशी, सोयाबीनचे उत्पादन कमालीचे घटले. त्यामुळे शेतकरी रब्बी हंगामातील पिकांकडे वळला. मात्र, अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, शनिवारी आणि रविवारी जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागांमध्ये गारपीटही झाली. बाश्रीटाकळी तालुक्यातील राजंदा शिवारात आंबा पिकांचे नुकसान झाले. पुनोती, निंबी वडगाव येथे डाळिंबाची झाडे उन्मळून पडली. सिंदखेड मोरेश्‍वर येथे वेलावर असलेल्या टरबुजाचे नुकसान झाले. ढेमशी पिकेही उद्ध्वस्त झाली. पुनोतीमध्ये डाळिंब पिकाचे नुकसान झाले. तेल्हारा तालुक्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे टरबूज, केळी, पपई पिके जमीनदोस्त झाली. अवकाळी पावसाचा फटका पातूर तालुक्यालाही बसला. तालुक्यातील चान्नी-चतारी, मळसूर, चांगेफळ, पिंपळखुटा, सायवणी परिसरातील आंबा, लिंबू, संत्रा पिकांचे नुकसान झाले. अकोला तालुक्यातील बाभूळगाव परिसरातील लिंबू व आंबा पिकांचे अतोनात नुकसान झाले. फळबागांचे नुकसान झाल्याने शासनाने तातडीने सर्व्हे करून मदत देण्याची मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे. जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची सर्व्हे करण्यात येत आहे. कृषी व महसूल विभागाचे कर्मचारी सर्व्हे करीत आहेत. मात्र, पावसामुळे सर्व्हे करण्यात व्यत्यय येत आहे. तसेच सर्वेक्षणातील आकडेवारीही बदलत आहे.

असे आहे फळांचे क्षेत्र

फळे                       क्षेत्र

संत्रा                    ३ हजार १५0 हेक्टर

लिंबू                    २ हजार ३00 हेक्टर

मोसंबी                             १५ हेक्टर

पेरू                                  १५२ हेक्टर

डाळिंब                             २५0 हेक्टर

चिकू                                  ७५ हेक्टर

सीताफळ                            ७५ हेक्टर

आवळा                               ९0 हेक्टर

आंबा                                  ६२५ हेक्टर