शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

‘किसान ॲप’चे वरातीमागून घोडे; वादळ-वारे येऊन गेल्यानंतर अलर्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:17 IST

किसान ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामान, अतिवृष्टी, वातावरणाची माहिती, पीकपाणी, पिकांवरील रोगराई, त्यासाठी नियोजन आदी माहितीचे संदेश दिले जातात. ही ...

किसान ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामान, अतिवृष्टी, वातावरणाची माहिती, पीकपाणी, पिकांवरील रोगराई, त्यासाठी नियोजन आदी माहितीचे संदेश दिले जातात. ही माहिती शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरते; परंतु गेल्या काही दिवसांपासून या ॲपद्वारे दिले जाणारे संदेश दोन- तीन दिवस उशिरा मिळत आहेत. १ ते ४ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे व विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे. हा संदेश शेतकऱ्यांच्या मोबाईलवर उशिरा आला. सध्याचे तंत्रज्ञानाचे युग असतानाही वेळ संपल्यावर संदेश येत आहेत. त्यामुळे हे ॲप नावापुरतेच आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वादळ-वारे येऊन गेल्यानंतर अलर्ट मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी फायदा कमी डोकेदुखी जास्त बनले आहे.

किसान ॲपवर काय मिळते माहिती?

ॲपवरून शेतकऱ्यांना कृषी हवामानविषयक माहिती मोबाईलवर पाठवून उपयुक्त सल्ले देण्यात येतात.

जिल्हा परिसरातील कृषी निविष्ठा व्यापारी, विक्री केंद्र यांची माहिती देण्यात येते.

जिल्ह्यातील सर्व बाजार समितींचे बाजारभाव देण्यात येतात. त्यामुळे दर माहिती करणे सोयीस्कर होते.

पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास पीक संरक्षण व तज्ज्ञ सल्ला याबाबत माहिती देण्यात येते.

अपडेट वेळेत मिळावे...

हवामान, वातावरणात होणारे बदलाचे अपडेट वेळेत मिळावे, त्यामुळे शेतीचे नियोजन करण्यात सोयीस्कर होईल.

बाजारभाव दररोज अपडेट झाल्यास माल विक्रीसाठी नेता येईल, शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही.

पीक संरक्षण सल्ला वारंवार अपडेट करावा, जेणेकरून बंदी असलेली कीटकनाशके कळतील.

इशारा मिळाला पण वादळ येऊन गेल्यानंतर!

हवामान बदलात सतर्कता महत्त्वाची आहे. वेळोवेळी वातावरणाचे संदेश मिळाल्यास पिकांची निगा राखण्यास फायदेशीर ठरते; परंतु गेल्या काही दिवसांपासून या ॲपच्या माध्यमातून माहिती अपडेट करण्यात येत नसल्याने अडचणी येत आहेत.

- नीलेश गवई, शेतकरी

पूर्वी पोस्टातून येणारी तार (टेलिग्राम) पत्र, नोकरीचा कॉल हे तारीख निघून गेल्यावर मिळाल्याचे अनेकांना ऐकिवात आहे. त्यास किसान ॲपच्या संदेशामुळे उजाळा मिळत आहे. जूनपासून पावसाळा सुरू होत आहे. आगामी काळात तरी किसान ॲपवरून दिले जाणारे संदेश, सावधानतेचे इशारे हे किमान एक-दोन दिवस अगोदर मिळावेत.

- राजेश पाटील, शेतकरी

किसान ॲपच्या माध्यमातून मिळणारे संदेश शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहेत. त्यावर शेती करताना चांगला उपयोग होतो. गेल्या काही दिवसांपासून येणारे संदेश उशिरा येत आहेत. त्यामुळे वरातीमागून घोडे असा प्रकार घडत आहे. पूर्वीप्रमाणे हे संदेश यावेत.

- विश्वनाथ इंगळे, शेतकरी