शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हुक्का पार्टीतील शिक्षकांवर कारवाई करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:29 IST

अकोला : हुक्का पार्लरमध्ये नशा करणार्‍या शिक्षकांवर पोलीस कारवाई झाली, त्या सर्वांना तातडीने निलंबित करा, अशी मागणी शिक्षण समितीच्या सभेत सर्व सदस्यांनी केली. त्यावर सभापती पुंडलिकराव अरबट यांनी कारवाई करण्याचा आदेश शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांना दिला. विशेष म्हणजे, शिक्षकांवर कारवाई होत नसल्याचे वृत्त सोमवारीच ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. 

ठळक मुद्देजि.प. शिक्षण समिती सदस्याची मागणीपोषण आहार अधीक्षक मालवे यांच्यावर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : हुक्का पार्लरमध्ये नशा करणार्‍या शिक्षकांवर पोलीस कारवाई झाली, त्या सर्वांना तातडीने निलंबित करा, अशी मागणी शिक्षण समितीच्या सभेत सर्व सदस्यांनी केली. त्यावर सभापती पुंडलिकराव अरबट यांनी कारवाई करण्याचा आदेश शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांना दिला. विशेष म्हणजे, शिक्षकांवर कारवाई होत नसल्याचे वृत्त सोमवारीच ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. शिक्षण समितीच्या सभेत सदस्य अक्षय लहाने, संतोष वाकोडे, प्रतिभा अवचार, ज्योत्स्ना चोरे, शबाना खातून, अनिता आखरे उपस्थित होत्या. कानशिवणी गटातील शिक्षक चर्‍हाटे शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांना वरलीचे आकडे लावण्यासाठी पाठवतात. त्यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्याची मागणी सदस्या प्रतिभा अवचार यांनी लावून धरली. त्यानुसार कारवाई करण्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. यावेळी विजय हरणे यांनी मागील सभेत उपस्थित केलेल्या मुद्यांवर चौकशी करून तातडीने कारवाई केली जाणार आहे. खेट्री येथील जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापकाचा प्रभार सहायक अध्यापिका सोनचळ यांच्याकडे आहे, त्यांना इतर अध्यापक सहकार्य करत नाहीत, त्या शिक्षकांची इतरत्र प्रतिनियुक्ती करा, असा आदेश सभापती अरबट यांनी दिला. सोबतच मळसूर येथील शाळेत चार विद्यार्थी असल्याने ती शाळा समायोजित करण्याचे सांगण्यात आले. 

पोषण आहार अधीक्षक मालवे यांच्यावर कारवाईअकोटचे पोषण आहार अधीक्षक संदीप मालवे गेल्या अनेक महिन्यांपासून माहिती देत नाहीत, सभेला उपस्थित राहत नाहीत, त्यांच्या तीन वेतनवाढी रोखण्याची कारवाई करा, असा आदेशही सभापती अरबट यांनी दिला.