शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चक्क शेजारची खोलीच हडपली!

By admin | Updated: August 27, 2016 03:05 IST

अकोला मनपा शिक्षणाधिका-यांना सुटेना निवासस्थानाचा मोह; स्टिंग ऑपरेशने उघडकीस आला प्रकार.

अकोला, दि. २६: महापालिकेच्या उच्चपदस्थ अधिकार्‍यांना सर्किट हाऊस व भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली असताना मनपाच्या कर्मचार्‍यांना मात्र तात्पुरत्या स्वरूपासाठी दिलेल्या सदनिका (निवासस्थान) सोडण्याचा मोह सुटता सुटत नसल्याची परिस्थिती आहे. यात भरीस भर म्हणून शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांनी मंजूर सदनिकेच्या व्यतिरिक्त इतरही खोलीवर ह्यकब्जाह्ण केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. महापालिकेच्या उच्चपदस्थ अधिकार्‍यांना निवासस्थानासाठी खदान पोलीस ठाण्यासमोरील दक्षता नगरच्या जागेवर इमारत उभारण्यात आली. इमारतीमध्ये पाच अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांना राहण्यासाठी ऐसपैस सदनिका बांधण्यात आल्या आहेत. यामध्ये आयुक्तांसाठी इमारतीच्या दुसर्‍या माळ्य़ावर प्रशस्त फ्लॅट उपलब्ध असून मनपाचे तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर रोकडे यांचा सर्वाधिक मुक्काम होता. तत्कालीन आयुक्त जी.एन. कुर्वे यांच्यानंतर मात्र सदनिकेची दुरवस्था ध्यानात घेऊन आयुक्त विपीन कुमार शर्मा यांनी भाड्याने घर घेणे पसंत केले. तेव्हापासून आयुक्तपदावरील अधिकारी भाड्याच्या घरात राहत आहेत. त्यापाठोपाठ इतरही उपायुक्त व सहायक आयुक्तांनी भाड्याने घर घेणे पसंत केले. तूर्तास मनपाच्या हक्काच्या शासकीय निवासस्थानामध्ये स्थानिक कर्मचार्‍यांनी मुक्काम ठोकला. तो अद्यापही कायम आहे. ही बाब लक्षात घेता महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी कर्मचार्‍यांना निवासस्थान सोडण्याची नोटीस जारी करण्याचे निर्देश बांधकाम विभागाला दिले. त्यानुसार शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना, विधी विभाग प्रमुख श्याम ठाकूर, प्रभारी लेखापाल अरुण पाचपोर यांना निवासस्थान सोडण्याची नोटीस प्रशासनाने १0 ऑगस्ट रोजी जारी केली. यापैकी लेखापाल अरुण पाचपोर यांनी तत्काळ निवासस्थान सोडून इतरत्र व्यवस्था केली. विधी विभाग प्रमुख शाम ठाकूर यांनी मनपाला एक महिन्याचा अवधी मागितला असून राहण्याची पर्यायी व्यवस्था होताच निवासस्थान सोडणार असल्याचे स्पष्ट केले. आयुक्तांना राहण्यासाठी बांधण्यात आलेल्या प्रशस्त सदनिकेत शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांचा मुक्काम आहे. त्यांनी निवासस्थान केव्हा सोडणार, याबद्दल प्रशासनाला अवगत तर केलेच नाही, शिवाय मंजूर सदनिकेच्या शेजारच्या निवासस्थानातील एका खोलीवर कब्जा करून त्यामध्ये बांधकाम केल्याची बाब उजेडात आली आहे.अधिकारी ह्यवेटिंगह्णवरपाचपैकी चार सदनिकांमध्ये एक हॉल, दोन बेडरूम, एक स्वयंपाकघर, एक स्टोअर रूम अशी व्यवस्था आहे. यामध्ये उपायुक्त सुरेश सोळसे, शहर अभियंता इक्बाल खान, नवनियुक्त सहायक आयुक्त जीतकुमार शेजव, विधी विभागाचे श्याम ठाकूर मुक्कामी आहेत. जलप्रदायचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे, सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले अद्यापही ह्यवेटिंगह्णवर आहेत.फ्लॅटमध्ये बांधकाम!सर्वात वरच्या माळ्य़ावर आयुक्तांसाठी बांधलेल्या प्रशस्त सदनिकेत शिक्षणाधिकारी सुलताना यांचा निवास आहे. त्यामध्ये दोन हॉल, तीन बेडरूम, एक स्वयंपाक घर, एक स्टोअर रूम उपलब्ध होती. याच सदनिकेतील उर्वरित एक हॉल व एक रूम जाधव नामक कर्मचार्‍याला देण्यात आल्याची बाब समोर आली आहे. या सदनिकेत बांधकाम करून एक खोली शिक्षणाधिकार्‍यांनी ताब्यात घेतल्याचे समोर आले.सहायक आयुक्तांना दोन रूम कशा?सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले यांना केवळ दोन रूम उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामध्ये एक हॉल व एका खोलीचा समावेश आहे. प्रशासनाने निवासस्थान सोडण्याची नोटीस दिल्यावर संबंधित कर्मचार्‍यांनी निर्देशांचे पालन करणे अपेक्षित आहे. निवासस्थान रिकामे करण्याची नोटीस दिली असून संबंधित कर्मचार्‍यांनी निर्देशांचे पालन करावे. शिक्षणाधिकार्‍यांनी त्यांना दिलेल्या सदनिकेत कोणाच्या निर्देशानुसार बांधकाम केले, याची माहिती घेतली जाईल. हा प्रकार गंभीर आहे. निवासस्थान सोडावेच लागेल, यात दुमत नाही. - अजय लहाने, आयुक्त, मनपाप्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या खोल्यांमध्येच निवास आहे. त्यानुसार मनपाला भाडे अदा केले जाते. इतर कोणतीही खोली ताब्यात घेतली नाही. या सदनिकेतील एक हॉल व एक खोली यापूर्वीच वेगळी करण्यात आली होती. त्या ठिकाणी तात्पुरती भिंत उभारली. ती कधीही काढता येऊ शकते. राहण्याची पर्यायी व्यवस्था होताच निवासस्थान रिकामे केले जाईल.- शाहीन सुलताना, शिक्षणाधिकारी, मनपा