उरळ (जि. अकोला) : नजीकच्या कळंबा बु. येथे खुल्या जागेत ठेवलेली लाकडे का फेकून दिली, याबाबत जाब विचारल्याच्या कारणावरून गावातील पिता-पुत्रांनी जागामालक पती-पत्नीस मारहाण करून जखमी केल्याची घटना ३१ मे रोजी घडली. या प्रकरणी जखमी पतीच्या फिर्यादीवरून हल्लेखोर पिता-पुत्राविरुद्ध उरळ पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. कळंबा बु. येथील भानुदास त्र्यंबक फुलमोडीकर यांनी त्यांच्या खुल्या जागेत इंधन म्हणून खरेदी केलेली लाकडे ठेवली होती. ती त्याच गावातील देवराव जुमळे व विनोद जुमळे या पिता-पुत्रांनी ३१ मे रोजी दुपारी २ वाजता फेकून दिली. त्यानंतर त्यांनी त्या जागेला काट्यांचे कुंपण घातले. त्याबाबत त्यांना फुलमोडीकर यांनी विचारले असता त्यांनी त्यांच्याशी वाद घालून शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांनी भानुदास फुलमोडीकर यांच्या डोक्यावर काठीने मारून त्यांना जखमी केले.तसेच त्यांच्या पत्नीच्या हातावर काठीने मारहाण केली. या घटनेबाबत भानुदास फुलमोडीकर यांनी उरळ पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी देवराव जुमळे व विनोद जुमळेविरुद्ध भा.दं.वि.चे ३२४, ५0४ व ५0६ कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास जमादार दादाराव लिखार व पोलीस नाईक संजय वानखडे हे करीत आहेत.
क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीस मारहाण
By admin | Updated: June 1, 2015 02:20 IST