शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
3
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
4
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
5
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
6
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
7
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
8
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
9
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
10
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
11
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
12
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
13
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
14
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
16
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
17
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
18
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
19
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
20
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...

‘हिंगणा’ हगणदरीमुक्तीकडे!

By admin | Updated: December 25, 2016 02:44 IST

जिल्हाधिका-यांनी केला होता धिक्कार.

संतोष येलकरअकोला, दि. २४-गावातील गोदरी पाहून चिडलेल्या जिल्हाधिकार्‍यांनी गावाचा धिक्कार केल्यानंतर जिल्हय़ातील पातूर तालुक्यातील हिंगणा गावातील ग्रामस्थांनी गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी सुरू केलेल्या सकारात्मक प्रयत्नात गावात शौचालय बांधकामांना गती आल्याने हिंगणा गावाची हगणदरीमुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत लोकसहभागातून करण्यात आलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी गत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत पातूर तालुक्यातील हिंगणा येथे गेले होते. त्यावेळी गावातील गोदरी पाहून चिडलेल्या जिल्हाधिकार्‍यांनी ग्रामस्थांसमोर तीव्र नाराजी व्यक्त केली. गाव हगणदरीमुक्त नसल्याने, आणि गावातील नागरिक उघड्यावर शौचास जात असल्यामुळे ह्यतुमच्या गावाचा धिक्कार असोह्ण अशा शब्दांत जिल्हाधिकार्‍यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकार्‍यांनी व्यक्त केलेली नाराजी ग्रामस्थांनी सकारात्क दृष्टीने मनावर घेतली आणि गाव हगणदरीमुक्त करण्याचा संकल्प केला. एकत्र आलेल्या ग्रामस्थांनी गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी पुढाकर घेत, गावात शौचालयांचे बांधकाम सुरू केले. एकूण ९५ घरे असलेल्या हिंगणा गावातील ५0 घरांमध्ये शौचालय बांधण्यात आले असून, २१ घरांमध्ये शौचालयांचे बांधकाम सध्या सुरू आहे. गावात शौचालय बांधकामांना गती आल्याने, हगणदरीमुक्त गावाच्या दिशेने हिंगणा गावाची वाटचाल सुरू झाली आहे.हगणदरीमुक्त गावासाठी हिंगणा येथे ग्रामस्थांनी सुरू केलेल्या प्रयत्नात शौचालय बांधकामांना गती आली आहे. त्यामध्ये शौचालय बांधकामासाठी हिंगणा येथील स्वप्ना विठ्ठल उजाडे या महिलेने त्यांच्या मुलीच्या कानातील सोन्याचे रिंग विकले आणि घरात शौचालयाचे बांधकाम सुरू केले.गावातील गोदरी पाहून जिल्हाधिकार्‍यांनी व्यक्त केलेली चीड हिंगणा येथील ग्रामस्थांनी सकारात्मक घेऊन, गाव हगणदरीमुक्त करण्याचा निर्धार केला. त्यासाठी गावात शौचालय बांधकामांना गती आली असून, लवकरच हे गाव हगणदरीमुक्त होणार आहे. शौचालय बांधकामासाठी पुढाकार घेतलेल्या ग्रामस्थांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले आहे.- संजय खडसे, उपविभागीय अधिकारी, बाळापूर.