शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हिंदुत्व आमचा श्‍वास, आम्हाला काेणी शिकवू नये! -  गुलाबराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 10:20 IST

Gulabrao Patil News राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा अकोल्याचे संपर्क मंत्री गुलाबराव पाटील यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला.

ठळक मुद्देसाेमवारी अकोला येथे पक्षाची बैठक घेतली. विराेधकांचा खरपूस समाचार घेतला.

अकाेला: हिंदुत्व हा शिवसैनिकाचा श्‍वास आणि ध्यास आहे. याबाबत आम्हाला काेणीही शिकवण्याची गरज नसल्याचे सांगत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा अकोल्याचे संपर्क मंत्री गुलाबराव पाटील यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला. आगामी सर्व निवडणुकांमध्ये विरोधकांना पाणी पाजणार असल्याचा विश्वास त्यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात व्यक्त केला.

शिवसेना नेते, मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे बुलडाणा व अकोला जिल्ह्याच्या संपर्क मंत्रीपदाची जबाबदारी येताच त्यांनी साेमवारी अकोला येथे पक्षाची बैठक घेतली. जिल्हाप्रमुख तथा आ.नितीन देशमुख यांनी आयाेजित मेळाव्यात मंत्री पाटील यांनी विराेधकांचा खरपूस समाचार घेतला. याप्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, शिवसेना हा प्रादेशिक पक्ष असला तरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे देशातील सर्वाधिक प्रभावी नेते असल्याचा आम्हा शिवसैनिकांना सार्थ अभिमान आहे. आजवर अनेक पक्षातील मुख्यमंत्र्यांपासून ते मंत्री, खासदार, आमदार फुटले,मात्र सच्चा शिवसैनिक कायम सेनेच्या साेबत असल्याचे मंत्री पाटील यावेळी म्हणाले. शिवसेना हा प्रखर हिंदुत्वाच्या विचारावर चालणारा पक्ष आहे. आम्ही फक्त जनहिताचाच विचार करतो. त्यामुळे माझ्यासारखा साधा शिवसैनिक आज मंत्रीपदावर विराजमान झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात जिल्हा प्रमुख तथा आ.नितीन देशमुख यांनी ग्रामपंचायत निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीचा लेखाजाेखा मांडला. आगामी दिवसांत जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेना व वंचित बहुजन आघाडी हे दाेनच पक्ष राहतील,असे नितीन देशमुख यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी सेनेचे सह संपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकर, उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, बंडू ढोरे, मुकेश मुरुमकार, राजेश मिश्रा तसेच जिल्ह्यातील तालुका प्रमुख शहर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन योगेश गीते यांनी केले. यावेळी राष्ट्रगीताने मेळाव्याची सांगता करण्यात आली.

टॅग्स :AkolaअकोलाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण