शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

वाग्दत्त जोडप्यास मारहाण करून लुटणारा गजाआड

By admin | Updated: November 8, 2016 02:17 IST

तीन आरोपी फरार; खरप परिसरातील घटना

अकोला, दि. ७- मुंबई येथे नोकरीस असलेल्या आणि दिवाळीनिमित्त अकोल्यात आल्यानंतर वाग्दत्त वधूसोबत खरप परिसरातून जात असताना या परिसरातील रहिवासी असलेल्या चौघांनी या जोडप्यास मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम व सोन्याची चेन लुटल्याची घटना रविवारी रात्री घडली. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी एकास अटक केली असून तीन आरोपी अद्यापही फरार आहेत.कार्ला येथील रहिवासी विवेक वानखडे हे मुंबई येथे प्लंबिंग वर्क्‍सचे कामकाज करतात. त्यांचे अकोल्यातीलच एका मुलीसोबत साक्षगंध झाले असून दोन महिन्यांनी विवाह सोहळा आहे. वानखडे दिवाळीला अकोल्यात आल्यानंतर ते त्यांच्या वाग्दत्त वधूला घेऊन खरप परिसरातून जात असताना त्यांना खरप येथील रहिवासी संजय अवधूत इंगळे, राष्ट्रपाल व त्यांच्या दोन साथीदारांनी अडविले. त्यानंतर शस्त्र आणि पाइपचा धाक दाखवून विवेक वानखडे यांच्या गळय़ातील ५0 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन काढून घेतली. त्यानंतर पर्स घेऊन त्यामधील १ हजार रुपये रोख, एटीएम कार्ड, नेट बँकिंगचे पासवर्ड आणि वाहन चालक परवाना काढून घेतला. यासोबतच त्यांना पाठीवर व चेहर्‍यावर मारहाण केली. लुटमार केल्यानंतर हे चोरटे फरार झाले. त्यानंतर वानखडे यांनी सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून पोलिसांनी चौघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३९४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. यामधील संजय इंगळे या आरोपीस अटक करण्यात आली असली तरी लुटमार करणारे तीन आरोपी अद्यापही मोकाट आहेत.फ्लेक्सवरील फोटोमुळे लुटारू जेरबंदविवेक वानखडे यांना मारहाण करून त्यांची सोन्याची चेन व पैसे घेऊन लुटारू पळून गेले. त्यानंतर वानखडे हे सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी खरप येथून परत निघाले असता त्यांना न्यू तापडिया नगरजवळ लावलेल्या शुभेच्छा फलकावर दोन लुटारूंचे छायाचित्र दिसले. या प्रकाराची माहिती सिव्हिल लाइन्स पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी फलकावरील दोघांची ओळख पटवून यामधील संजय इंगळे याला अटक केली, तर राष्ट्रपाल नामक लुटारूचा शोध सुरू केला आहे. शुभेच्छा फलकावरच्या छायाचित्रामुळे या लुटमारीचा काही वेळातच पर्दाफाश झाला.