शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग चौपदरीकरणाचे घोडे नव्याने धावणार

By admin | Updated: November 7, 2014 00:57 IST

कामाचे कंत्राट देण्याचे नियोजन सुरू.

अकोला : अमरावती ते जळगाव आणि जळगाव ते गुजरात या ५५५ किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे नव्याने कंत्राट देण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमार्फत करण्यात आले आहे. लवकरच या कामाची निविदा प्रक्रियादेखील सुरू होणार असल्याने, महामार्ग चौपदरीकरणाचे अडलेले घोडे नव्याने धावणार आहेत.अमरावती ते जळगाव २७५ आणि जळगाव ते गुजरातपर्यंत २८0 किलोमीटर अशा दोन ट प्प्यांतील एकूण ५५५ किलोमीटरच्या महामार्गाचे चौपदरीकरण करण्याच्या कामाचे कंत्राट दीड वर्षांपूर्वी एल अँन्ड टी कंपनीला देण्यात आले होते. अकोला जिल्ह्यातून जाणार्‍या या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी जमिनीचे हस्तांतरण व त्यापोटी संबंधित शे तमालकांना मोबदला देण्याची प्रक्रियादेखील महसूल विभागामार्फत पूर्ण करण्यात आली. चौपदरीकरणाच्या कामासाठी या महामार्गावरील झाडे तोडण्यासह साफसफाईचे कामही करण्यात आले; मात्र गेल्या वर्षभरापासून एल अँन्ड टी कंपनीमार्फत महामार्ग चौपदीकरणाचे काम सुरू करण्यात आले नाही. काम करण्यास े नकार दिल्याने आणि काम सुरू करण्यात आले नसल्याने गेल्या १0 सप्टेंबर रोजी एल अँन्ड कंपनीसोबत झालेला कारारनामा केंद्र शासनामार्फत समाप्त करण्यात आला. जुना करारनामा रद्द करण्यात आल्याने महामार्ग चौ पदरीकरणाच्या कामाचे नव्याने कंत्राट देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून नियोजन सुरू करण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच निविदा मागवल्या जातील.