शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील बसथांबे ठरताहेत मृत्यूचे प्रवेशद्वार!

By admin | Updated: December 3, 2014 01:08 IST

गावांसमोरील प्रवासी निवारे बनले शोभेच्या भिंती.

नितीन गव्हाळे / अकोलाअकोला : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा व जिल्ह्यातील राज्य मार्गांंवर रात्रंदिवस वाहने धावतात. कोणाचेही नियंत्रण नसल्याने महामार्गांंवरील वाहतूक बेताल झाली आहे. अशातच गावांजवळील बसथांब्यांवर किंवा रस्त्याच्या कडेला बस-ऑटोरिक्षांची वाट पाहणारे प्रवासी जीव धोक्यात घालून उभे असतात. अलीकडे बसथांब्यांजवळ, गावाजवळून जाणार्‍या महामार्गांंवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच महामार्ग व राज्य मार्गांंवरील बसथांबे प्रवाशांसाठी मृत्यूचे प्रवेशद्वार बनले आहेत. ह्यलोकमतह्ण चमूने मंगळवारी दुपारी व्याळा ते कुरणखेडपर्यंंतच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ चे सर्वेक्षण केले. सर्वेक्षणादरम्यान प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत शासन किती निष्काळजी आहे, हेच दिसून आले. शहरातून, गावातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गांंवर शेकडो ठिकाणी बसथांबे आहेत. दररोज हजारो प्रवासी बस व इतर वाहनांची वाट पाहत विविध ठिकाणच्या बसथांब्यांवर थांबतात. या थांब्यावर स्वत:चा जीव धोक्यात घालून प्रवासी उभे असतात. दरम्यान, या प्रवाशांच्या जवळून अनेक जड वाहने, ट्रॅव्हल्स, ट्रक, कंटेनरसारखी वाहने भरधाव निघून जातात. अशा वाहनांनी प्रवाशांना धडक देऊन जखमी केल्याच्या किंवा त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. १६ नोव्हेंबर रोजी पुणे-बंगळुरू महामार्गावर सातारा जिल्हय़ातील पारगाव येथे बसची वाट पाहत असलेल्या आठ प्रवाशांना एका कंटेनरने चिरडल्याने आठही जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेसारख्याच अकोला जिल्हय़ातही अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत; परंतु या घटना किरकोळ स्वरूपाच्या होत्या. तथापि. भविष्यात बसथांब्यांवरसुद्धा पारगावच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.