शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मोसमातील सर्वोच्च तापमानाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2016 01:35 IST

४५.३ अंश सेल्सिअस: सकाळीच कामे आटोपण्यावर भर, दुपारी रस्ते निर्मनुष्य.

अकोला: शहरात उष्णतेची लाट आली असून, या मोसमात तापमान उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने रविवारी ४५.३ अंश सेल्सिअस एवढी तापमानाची नोंद घेतली. परिणामी रविवारी दुपारी घराबाहेर पडणेही मुश्कील झाले होते.सकाळी ९ पासूनच उन्हाचे चटके बसू लागले होते. रस्त्यावरून दुचाकीने किंवा पायी जाताना प्रत्येक जण तोंडाला व डोक्याला बांधल्याशिवाय जाताना दिसत नव्हता. सकाळी रस्त्यांवर जशी वर्दळ होती, तशी वर्दळ दुपारी नव्हती. रस्ते निर्मनुष्य झाले. बाजारपेठेत शुकशुकाट झाला. वातानुकूलित यंत्रणादेखील उष्णतेपुढे अपुर्‍या पडत असल्याची स्थिती होती. घरात पंखे उष्ण वारा देत असल्याने नागरिक हैराण झाले होते. विशेष म्हणजे, रुग्ण, लहान बाळ आणि वृद्ध यांना या उष्ण लहरींचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत होता. मागील वर्षापेक्षा यावर्षी सतत तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या वर राहिले आहे.गुरुवारी व शुक्रवारी सलग दोन दिवस कमाल तापमान ४४.६ व ४४.२ अंश सेल्सिअस एवढे होते. एप्रिल महिन्यात १६ एप्रिल रोजी ४४.४ अंश सेल्सिअस तापमान होते. २0 एप्रिल रोजी पुन्हा कमाल तापमान ४५ अंशावर पोहोचले होते. १ मे रोजी ४४.७ अंशापर्यत तापमान पोहोचले होते.