शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांच्या आदेशाला हायकोर्टाची स्थगिती

By admin | Updated: June 8, 2017 01:38 IST

भाजप नगरसेवक अनिल गरड यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भाजपचे नगरसेवक अनिल गरड यांना नगरसेवक पदावरून अपात्र करण्याच्या विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता यांच्या आदेशाला नागपूर हायकोर्टाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने बुधवारी स्थगिती दिली. हायकोर्टाच्या निर्णयामुळे अनिल गरड यांना दिलासा मिळाला आहे. एसटी महामंडळात सेवारत असलेल्या अनिल गरड यांनी भाजपाच्यावतीने प्रभाग क्रमांक १० मधून महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक लढवली. या निवडणुकीत गरड विजयी झाले. महामंडळात सेवारत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवडणूक लढण्यापूर्वी पदाचा राजीनामा देणे बंधनकारक असून, राजीनामा दिल्यानंतर कर्मचारी निवडणूक लढण्यास पात्र ठरत असल्याचा दावा करीत शिवसेना नेते विजय मालोकार यांनी विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी विभागीय आयुक्तांनी ३ जून रोजी गरड यांना नगरसेवक पदावरून अपात्र घोषित करण्याचा आदेश जारी केला. विभागीय आयुक्तांच्या आदेशाला आव्हान देत अनिल गरड यांनी नागपूर उच्च न्यायालयात द्विसदस्यीय खंडपीठाकडे बुधवारी (७ जून) याचिका दाखल केली. सुनावणीअंती विभागीय आयुक्तांच्या आदेशाला हायकोर्टाने स्थगिती दिली. याचिकाकर्ते गरड यांच्यावतीने अ‍ॅड. संदीप चोपडे यांनी बाजू मांडली. असा मिळवला स्थगनादेश!विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता यांनी ३ जून रोजी अनिल गरड यांना पदावरून अपात्र करण्याचा आदेश जारी केला. याचिकाकर्ते अनिल गरड यांच्यावतीने विधिज्ञ संदीप चोपडे, संतोष रहाटे यांनी ५ जून रोजी नागपूर हायकोर्टात द्विसदस्यीय खंडपीठात याचिका दाखल केली. एसटी महामंडळातील कर्मचारी निवडणूक लढवत असेल, तर त्याबाबतीत कारवाई करण्याची जबाबदारी महामंडळाची आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमांतर्गत विभागीय आयुक्तांना काही ठरावीक बाबतीत नगरसेवकांना अपात्र करण्याचे अधिकार आहेत. सदर प्रकरण महामंडळाशी संलग्न असल्यामुळे याप्रकरणी विभागीय आयुक्तांना अपात्र करण्याचा अधिकार नसल्याची भूमिका विधिज्ञ संदीप चोपडे यांनी ५ जून रोजी उच्च न्यायालयात मांडली. त्यावर द्विसदस्यीय खंडपीठाने विभागीय आयुक्तांना असा आदेश पारित न करण्याचे निर्देश जारी केले. बुधवारी (७ जून) सकाळी अ‍ॅड. संदीप चोपडे यांनी द्विसदस्यीय खंडपीठात विभागीय आयुक्तांच्या आदेशाला स्थगनादेश देण्याची रिट पिटीशन दाखल केली असता उच्च न्यायालयाने स्थगितीचा आदेश दिला.