शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

खर्चावर उच्च न्यायालयाचे ताशेरे

By admin | Updated: December 22, 2014 01:16 IST

कान्हेरी-एरंडा रस्ता: १.३ किलोमीटर रोड दुरुस्तीवर २६ लाख खर्च.

अकोला : शहरापासून नजीकच असलेल्या कानेरी-एरंडा रोडच्या दुरुस्तीसाठी २६ लाख रुपये योग्य पद्धतीने खर्च झाले नाहीत, असे निरीक्षक मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले आहे. अवघ्या १.३ किलोमीटर रोडच्या दुरुस्तीवर २६ लाख २६ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. एवढा अवाढव्य खर्च केल्यानंतरही केवळ सहा महिन्यांत रोडची दुरवस्था झाली आहे. अकोला शहरापासून जवळच असलेल्या कानेरी-एरंडा या १३ किलोमीटर रोडपैकी १.३ किलोमीटर रोडची २६ लाख २६ हजार रुपये खर्चून दुरुस्ती करण्यात आली आहे. हा रोड आज पायदळ चालण्यायोग्यही राहिलेला नाही. यामुळे प्रकाश सारप व इतर नागरिकांनी जनहित याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात अकोला जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता व्ही.एल. कुंभारे हे न्यायालयाला खोटी माहिती दिल्यामुळे अडचणीत आले आहेत. २६ नोव्हेंबर रोजी त्यांनी या रोडची अवस्था साधारण चांगली असल्याचे सांगून रोड एकदम खराब असल्याचा आरोप फेटाळला होता. यामुळे न्यायालयाने अकोला येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विजय भाले यांना रोडचे निरीक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार भाले यांनी १.३ किलोमीटरपैकी 0.४ किलोमीटर रोड सोडून इतर रोड खराब असल्याची माहिती दिली. परिणामी कुंभारे यांचा खोटेपणा उघड झाला. न्यायालयाने कुंभारे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून न्यायालय अवमाननेची कारवाई का करण्यात येऊ नये अशी विचारणा केली आहे. तसेच यावर १४ जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यादरम्यान अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंत्यांनी कुंभारे व कंत्राटदाराविरुद्ध विभागीय कारवाई करावी असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. पुढच्या तारखेला प्रतिज्ञापत्र सादर करून दोघांविरुद्ध काय कारवाई केली याची माहिती देण्याची सूचना करण्यात आली आहे. रोडच्या कामात २६ लाख रुपये योग्य पद्धतीने खर्च झाले नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.