शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णाची माहिती दडवली; आता उपचारासाठी नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 10:54 IST

अपार्टमेंटमधील रहिवाशी स्वत:वर उपचार करून घेण्यास नकार देत असल्याची माहिती समोर आली आहे.

अकोला : जुने शहरातील श्रीवास्तव चौक परिसरात एका अपार्टमेंटमध्ये कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णाची माहिती दडविण्यात आल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला आहे. या रुग्णावर उपचार करण्यास विलंब झाल्याने त्याचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतरही अपार्टमेंटमधील रहिवाशी स्वत:वर उपचार करून घेण्यास नकार देत असल्याची माहिती समोर आली आहे. अपार्टमेंटमधील नागरिकांचा मुक्तसंचार लक्षात घेता स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.जुने शहरातील श्रीवास्तव चौक परिसरातील अपार्टमेंटमध्ये एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली; परंतु या अपार्टमेंटची बदनामी होईल या विचारातून कोरोनाबाधित रुग्णांची माहिती सामूहिकरीत्या दडविण्यात आली. त्यामुळे सदर व्यक्तीवर उपचार करण्यास विलंब झाला. या व्यक्तीला खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला असता रुग्णालयाने दाखल करून घेण्यास नकार दिल्याने संबंधित रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्याच दिवशी संबंधित रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यानंतर या मृत व्यक्तीच्या कुटुंबातील आणखी एका व्यक्तीलासुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अपार्टमेंटमधील इतर रहिवाशांनी महापालिका प्रशासनाला सूचना देणे अपेक्षित होते. तसे न करता रहिवाशांनी जाणीवपूर्वक चुप्पी साधणे पसंत केले आहे.

सामूहिक बैठकीत घेतला निर्णयसंबंधित अपार्टमेंटमधील नागरिकांनी कोरोनाबाधित रुग्णाची माहिती दडविण्यासंदर्भात सामूहिक बैठकीचे आयोजन केले होते. त्यामुळे या दबावापोटी मृत व्यक्तीच्या कुटुंबातील कोरोनाबाधित रुग्णाने व त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीसुद्धा मनपाला अवगत केले नसल्याची माहिती आहे.

मुक्तसंचारामुळे परिसरात भीतीचे वातावरणअपार्टमेंटमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतरही इतर रहिवाशांचा परिसरात मुक्तसंचार असल्याचे चित्र आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीती व धास्तीचे वातावरण आहे.या गंभीर प्रकाराकडे महापालिका लक्ष देणार का, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची माहिती दडविल्याप्रकरणी अपार्टमेंटमधील नागरिकांवर गुन्हा दाखल करणार का, मनपा कर्मचाऱ्यांसोबत अरेरावी करणाºया व्यक्तींवर कारवाई करणार का, असे नानाविध प्रश्न उपस्थित झाले आहेत.मनपा कर्मचाºयांसोबत अरेरावीसंबंधित अपार्टमेंटमधील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बाब परिसरातील स्थानिक रहिवाशांना समजल्यानंतर त्यांनी मनपा प्रशासनाला सूचित केले. त्यामुळे अपार्टमेंटचा परिसर कंटेनमेन्ट झोन घोषित करून त्या ठिकाणी बॅरिकेड लावण्यासाठी गेलेल्या मनपा कर्मचाºयांसोबत सदर अपार्टमेंटमधील रहिवाशांनी अरेरावी करून त्यांना हुसकावून लावल्याची माहिती आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या