पारस येथील सुनील लांडे यांनी मुलीच्या आजारावर उपचार करण्यासाठी पैशांची आवश्यकता असल्याने, मदतीची विनंती केली होती. उपचारासाठी १४ लाखांची गरज आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती पाहता, एवढे पैसे जुळवणे कठीण होते. एक अल्पभूधारक शेतकरी. त्यात उपचारांमुळे त्यांच्यावर कर्ज सुद्धा झाले आहे. त्यामुळे त्यांनी, चिमुकलीच्या उपचारासाठी मदतीची विनंती केली होती. त्यांच्या विनंतीची दखल घेत, बाळापूर व तेल्हारा तालुक्यातील युवक व सहृदयी नागरिकांनी हेल्प फॉर समृद्धी हा सोशल मीडियावर ग्रुप तयार करून मदतीचे कॅम्पेन हाती घेतले. पाहता-पाहता, प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे भरपूर निधी उभा झाला. सुनील लांडे यांच्या बॅंग अकाउंंटवर १४ लाख रुपयांच्या जवळपास निधी जमा झाल्यामुळे सुनील लांडे यांनी मदत थांबविण्याची विनंती केली होती. त्यानुसार सरस्वती विद्यालय पारसचे माजी मुख्याध्यापक आर. एन. वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन सभा घेऊन हेल्प फाॅर समृद्धी कॅम्पेन थांबविण्याचे जाहीर करण्यात आले. सध्या समृद्धीवर अहमदाबाद येथील सीआयएमएस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
फोटो:
या युवकांनी घेतला मदतीसाठी पुढाकार
सुमित कोठे, नागेश दांडगे, संघर्ष सावरकर, प्रशांत बुले, अक्षय अवताडे, चेतन पाडीया, प्रवीण डेरे, विश्वजित दांडगे, मनीष कराळे, राहुल कराळे, जगदीश रेवतकर, राजेंद्र वानखडे, अविनाश डिक्कर, अविनाश भारसाकळे, मनीष कराळे ,राहुल कराळे, राजेंद्र वानखडे, सत्यशील सावरकर, किरण अवताडे, सुधाकर खुमकर, धनंजय मिश्रा, दीपक अवताडे, ज्ञानेश्वर मांडेकर, मंगेश दुतोंडे, धनंजय खुमकर, आशिष देशमुख, नीलेश धांडे, विश्वजित डांगे, मोहन तराळे, अमोल पोटे, गुंजन गोळे, प्रांजली धोरण, ज्योती मानकर, जया मांजरे, शुभम बहाकर, विनायक तायडे, मनीष गिऱ्हे, मनोहर शेळके, मंगेश सोनोने, मंगेश लांडे, केशव मालेकार, रजनीश ठाकरे, प्रशांत भारसाकळे. प्रवीण भोटकर, गोपाल सुरे, योगेश वानखडे, राजेश भावसार, नितीन धोरण, अनंता बेलोकार, विनीत भारसाकळे, सै. परवेझ, चेतन चराटे, किरण जंजाळ, राजा खान, सोनू चावरिया, मंगेश पाथ्रीकर यांनी पुढाकार घेऊन हेल्प फाॅर समृद्धी कॅम्पेन चालविले.
असे राबविले कॅम्पेन
हेल्प फॉर समृद्धी ग्रुपच्या माध्यमातून अनेकांनी नातेवाईक, मित्रमंडळींना मदतीची विनंती करीत, हे कॅम्पेन पुढे रेटले. अवघ्या सहा दिवसांत विक्रमी कॅम्पेन राबवित आवश्यक मदतीचे उद्दिष्ट गाठले. प्रत्येकी रुपये ५००, १००० रुपयांच्या स्वरूपात रक्कम जुळून आली. या मोहिमेत मदतीसाठी हजारो सहृदयी लोक जुळले. यातून समृद्धीच्या उपचारासाठी आवश्यक रक्कम जुळून आली. या कॅम्पेनमधून संवेदनशील समाजवृत्तीचे दर्शन घडले. त्यामुळे कॅम्पेन थांबविण्याचे संयोजक नागेश दांडगे यांनी कळविले.
त्याकरिता मोबाइल कॅम्पेनद्वारे हेल्प समृद्धी कॅम्पेनने मदतीचे संदेशवहन केले परिणामी आवश्यक तो निधी जमा करणे शक्य झाल्याने ऑनलाइन सभा घेऊन मदत निधी थांबविण्याचे ठरविण्यात आले आहे. पारस येथील समृद्धी लांडे या मुलीवर CIMS हॉस्पिटल अहमदाबाद येथे सुरू आहे. त्याकरिता हॉस्पिटल ने १४ लाख रुपये खर्च सांगितला होता. त्याकरिता मोबाइल कॅम्पेनद्वारे हेल्प समृद्धी कॅम्पेनने मदतीचे संदेशवहन केले परिणामी आवश्यक तो निधी जमा करणे शक्य झाल्याने ऑनलाइन सभा घेऊन मदत निधी थांबविण्याचे ठरविण्यात आले आहे. पारस येथील समृद्धी लांडे या मुलीवर CIMS हॉस्पिटल अहमदाबाद येथे सुरू आहे. त्याकरिता हॉस्पिटलने १४ लाख रुपये खर्च सांगितला होता.