शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मदत अपुरी; वाटपाचा पेच!

By admin | Updated: January 12, 2015 01:51 IST

अकोला जिल्ह्याच्या मागणीच्या तुलनेत ४0 टक्केच निधी.

संतोष येलकर/अकोलाजिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात केवळ ४0 टक्के निधी प्राप्त झाला. मागणीच्या तुलनेत मदत निधी अपुरा असल्याने, उपलब्ध निधीतून मदतीचे वाटप कोणकोणत्या गावांमधील शेतकर्‍यांना करायचे, असा पेच महसूल प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.उत्पादन बुडाल्याने जिल्ह्यातील खरीप पिकांची सुधारित सरासरी पैसेवारी ४१ पैसे आहे. नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये २ लाख ९७ हजार २२१ शेतकर्‍यांच्या ४ लाख १६ हजार ७९५ हेक्टर ९२ आर क्षेत्रावरील पिके बाधित झाली. राज्यातील दुष्काळ निवारणासाठी सात हजार कोटी रुपयांचे ह्यपॅकेजह्ण राज्य शासनामार्फत नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान गत ११ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आले. त्यानुषंगाने दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी शासनाकडून मदत निधीचे वितरण करण्यात आले. मदत निधीच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी शासनाकडून ७५ कोटी ७ लाखांचा निधी ९ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. प्राप्त झालेली मदत दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करायची आहे; मात्र जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त २ लाख ९७ हजार २२१ शेतकर्‍यांना मदत वाटप करण्यासाठी १८0 कोटी २८ लाख रुपये मदतनिधीची आवश्यकता आहे. मदतीसाठी एकूण आवश्यक असलेल्या निधीच्या तुलनेत ४0 टक्केच मदतनिधी प्राप्त झाला. उपलब्ध निधीतून दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदतीचे वाटप कसे आणि कोण-कोणत्या गावातील शेतकर्‍यांना करायचे, असा पेच आता महसूल प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. प्राप्त झालेली मदत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तालुका स्तरावर वितरित करण्यात येणार आहे; मात्र मदतनिधी कमी असल्याने, उपलब्ध निधीतून पहिल्या टप्प्यात कोण-कोणत्या गावातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदतीचे वाटप सुरू करायचे, याबाबतचा गुंता जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांसमोर निर्माण झाला आहे.