शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आई-पत्नीच्या मदतीनेच सचिनची हत्या

By admin | Updated: March 18, 2015 01:35 IST

अकोला तालुक्यातील घटना; अनैतिक संबंधासाठी आई-पत्नीच्या नात्याला फासली काळिमा.

अकोला: शिवणीमध्ये रविवारी मध्यरात्री घडलेल्या सचिन भटकर हत्याप्रकरणाचा गुंता सोडविण्यात पोलिसांना मंगळवारी यश आले. अनैतिक संबंधांमध्ये अडसर होत असल्यानेच त्याची हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले. सचिनची हत्या करणार्‍या विजय नरवाडे याच्यासह त्याला मदत करणारी सचिनची आई व पत्नी या तिघांनाही जेरबंद करण्यात आले आहे. अनैतिक संबंधांसाठी वासनांध झालेल्या आई आणि पत्नीच्या महान नात्याला या घटनेमूळे काळीमा फासल्या गेली असून या तीनही आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. शिवणीमधील राहुलनगर येथील रहिवासी सचिन नाजुकराव भटकर (२७) याचा मृतदेह याच परिसरातील खदान भागात सोमवारी पहाटे आढळल्यानंतर पोलिसांनी या हत्याप्रकरणातील मारेकर्‍यांचा शोध सुरू केला. सोमवारी रात्री उशिरा या प्रकरणात चिखलपुरा येथील रहिवासी विजय नरवाडे मृतक सचिन भटकर याची आई चंदा भटकर आणि पत्नी सरिता भटकरसह आणखी सात जनांना ताब्यात घेउन त्यांची कसून चौकशी सुरु केली. यामधील विजय नरवाडे आणि सचिनची आई चंदा व पत्नी सरिता यांनी सिव्हील लाईन्स पोलिसांसमोर सचिनची हत्या केल्याची कबूली दिली. सचिन भटकरला या प्रकरणातील तीनही आरोपींचे अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली होती. त्यामूळे त्याने या अनैतिक संबधाला विरोध केला. सचिन भटकर अडसर ठरत असल्याने त्याची आई आणि पत्नी यांनी सचिनचा अडसर कायमस्वरूपी दूर केला. रविवारी मध्यरात्री त्याची राहत्या घरातच हत्या करून मृतदेह एका दुचाकीवर घेऊन खदानमध्ये टाकण्याचा बेत आखला, मात्र मृतदेह घेऊन जात असताना अडथळा आल्याने या तिघांनी त्याचा मृतदेह शिवणीतील खदान परिसरात फेकला. सोमवारी पहाटे चंदा आणि सरीता यांनी मुलाची हत्या झाल्याचे नाटक करीत आकांड-तांडव केला.