शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

बागायतदारांना ‘कोरडवाहू’ची मदत!

By admin | Updated: January 22, 2015 02:05 IST

बागायतीच्या मदतीतून कापूस उत्पादक बागायतदार शेतकरी बाद.

संतोष येलकर / अकोला: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये कोरडवाहू, बागायती व फळबाग शेतीसाठी मदत दिली जात आहे; मात्र बागायतदार शेतकर्‍यांना दिल्या जाणार्‍या मदतीत खरीपपूर्वी कपाशीची लागवड करणार्‍या बागायतदार कापूस उत्पादक शेतकर्‍यांना कोरडवाहू शेतीची मदत दिली जात आहे. त्यामुळे बागायतदार शेतकर्‍यांना दिल्या जाणार्‍या सरकारी मदतीतून कापूस उत्पादक बागायतदार शेतकर्‍यांना बाद करण्यात येत असल्याची बाब समोर येत आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यात खरीप हंगामातील पिके शेतकर्‍यांच्या हातून गेली. नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला. या पृष्ठभूमीवर विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारकडून सात हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले. त्यामध्ये दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी मदतही जाहीर करण्यात आली. त्यानुसार मदत वाटपाच्या पहिल्या टप्प्यात शासनाकडून जिल्हानिहाय मदत निधीचे वितरण करण्यात आले असून, मदतीची रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले आहे. या मदतीमध्ये अल्प व अत्यल्पभूधारक शेतकर्‍यांना दोन हेक्टर र्मयादेपर्यंंत आणि बहुभूधारक शेतकर्‍यांना एक हेक्टर र्मयादेपर्यंंत मदतीचे वाटप करण्यात येत आहे. त्यामध्ये जिरायती (कोरडवाहू) शेतीसाठी प्रतिहेक्टर ४ हजार ५00 रुपये, बागायती शेतीसाठी प्रतिहेक्टर ९ हजार रुपये आणि फळबागांसाठी प्रतिहेक्टर १२ हजार रुपये मदत दिली जात आहे. बागायतदार शेतकर्‍यांना प्रतिहेक्टर ९ हजार रुपयांप्रमाणे मदतीचे वाटप करण्यात येत असले तरी, मे महिन्यात मान्सूनपूर्व कपाशी, सोयाबीन व तूर इत्यादी पिकांची लागवड करणार्‍या बागायतदार शेतकर्‍यांना कोरडवाहू शेतीसाठी दिली जाणारी मदत वाटप केली जात आहे. बागायती शेतीप्रमाणेच मान्सूनपूर्व कपाशी तसेच सोयाबीन व तूर इत्यादी पिकांना विहिरी, बोअर व शेततळ्यातून पाणी देऊन पिकांना जगविले जाते. त्यानुसार सरकारकडून बागायतदार शेतकर्‍यांना दिल्या जाणार्‍या मदतीप्रमाणेच कापूस, सोयाबीन व तूर इत्यादी बागायती पिकांसाठीही बागायतदार शेतकर्‍यांना हेक्टरी ९ हजार रुपये मदत मिळणे अपेक्षित असताना, या बागायतदार शेतकर्‍यांना मात्र कोरडवाहू शेतीसाठी दिली जाणारी हेक्टरी ४ हजार ५00 रुपयांप्रमाणे मदत दिली जात आहे. त्यामुळे बागायत पिकांसाठी देण्यात येणार्‍या मदतीतून कापूस उत्पादक बागायतदार शेतकर्‍यांना बाद करण्यात आल्याची बाब समोर येत आहे.

 *बागायती पिकांचे निकष कोणते?

      बागायती पिकांप्रमाणेच मान्सूनपूर्व कपाशी, सोयाबीन व तूर इत्यादी पिकांची लागवड केली जाते. विहीर, बोअर, शेततळी व कॅनॉलमधील पाण्याचा वापर करून ही पिके घेतली जातात. इतर बागायती पिकांप्रमाणेच ही पिके घेतली जात असताना, बागायती शेतीसाठी दिली जाणारी मदत मात्र या पिकांसाठी दिली जात नाही. त्यामुळे बागायती पिकांचे निकष कोणते, असा प्रश्न दुष्काळग्रस्त कापूस उत्पादक बागायतदार शेतकर्‍यांकडून उपस्थित केला जात आहे.