शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
6
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
7
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
8
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
9
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
10
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
11
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
12
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
13
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
14
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
15
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
16
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
17
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
18
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
19
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
20
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार

पत्रकारितेच्या विचारांची उंची अनुकरणीय

By admin | Updated: January 7, 2017 02:29 IST

सीईओ अरुण विधळे यांच्या हस्ते पत्रकार दिनी गुणवंत पत्रकारांचा सत्कार

अकोला, दि. 0६- पत्रकारिता करताना धावपळ आणि विविध क्षेत्रातील ज्ञान आवश्यक असते. वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणीच्या बातम्यातून पत्रकारितेच्या विचारांची उंची झळकत असते, ती अनुकरणीय आहे. असे प्रतिपादन अकोला जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी अरुण विधळे यांनी केले. मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्नित अकोला जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. निमवाडीस्थित पत्रकार भवनातील स्व. पन्नालाल शर्मा सांस्कृतिक सभागृहात गुणवंत पत्रकाराच्या स त्काराने पत्रकार दिन साजरा करण्यात आला.पत्रकार दिन सोहळ्य़ाच्या मंचावर विधळेसह जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, जिल्हाध्यक्ष शौकतअली मीरसाहेब, सरचिटणीस प्रमोद लाजूरकर, ज्येष्ठ पत्रकार प्रा. मधू जाधव, महेंद्र कविश्‍वर उपस्थित होते. आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि हारार्पणाने कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रास्ताविक सिद्धार्थ शर्मा यांनी केले. माहिती अधिकारी पाटील यांनी आचार्य जांभेकरांचा जीवनपट उलगडला. पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शौकतअली मीरसाहेब यांनी पत्रकार संघाच्या वाटचालीवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला पत्रकार संघाचे पदाधिकारी रामदास वानखडे, गजानन सोमाणी, कीर्तीकुमार वर्मा, विजय शिंदे, संदीप पांडव, मुकुंद देशमुख, विनायक पांडे, डॉ. अतिकुर रहेमान, अजय जहागिरदार, सुरेश नागापुरे, मिलिंद गायकवाड, धनंजय साबळे, उमेश देशमुख, राजू उखळकर, संजय अलाट, कमल शर्मा, दिलीप ब्राह्मणे, अकबर खान, विठ्ठल देशमुख, जीवन सोनटक्के, अनुप ताले, प्रा. मोहन खडसे, सत्यशील सावरकर, अँड. शरद गांधी, प्रकाश भंडारी, विलास देशमुख, रामविलास शुक्ल, अनंत वानखडे, सुरेश राठोड, गणेश देशमुख, लक्ष्मण हागे, हबीब शेख, नंदू सोपले, श्रीकांत जोगळेकर आदी प्रामु ख्याने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रमोद लाजुरकर यांनी तर आभार प्रदर्शन संजय खांडेकर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. पत्रकार दिनाचे औचित्य साधून यावेळी जिल्हय़ातील गुणवंत पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार रामदास उगले, केशवराव लुले, विनायक काजळे, पुरस्कार प्राप्त सचिन राऊत, प्रा. अविनाश बेलाडकर, वृत्तपत्र छायाचित्र पत्रकार प्रवीण ठाकरे, नीरज भांगे, चंद्रकांत पाटील यांचा शाल, श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.