शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

मद्यधुंद तरुणींचा महामार्गावर हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 01:50 IST

अकोला : राष्ट्रीय महामार्गावरील निमवाडी पुलावर चार तरुणींनी खुलेआम बिअर ढोसल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी घडला. वर्दळीच्या या रोडवर हाताता बॉटल घेऊन बिअर पित असताना या तरुणींनी हैदोस घालत प्रचंड धुमाकूळ सुरू केला होता; मात्र सायंकाळी या बेभाण तरुणींची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी बिअर पिणार्‍या चारही तरुणींना ताब्यात घेऊन त्यांना सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते.

ठळक मुद्देचार तरुणी पोलिसांच्या ताब्याततरुणींनी खुलेआम ढोसल्या बिअर राष्ट्रीय महामार्गावरील निमवाडी पुलावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राष्ट्रीय महामार्गावरील निमवाडी पुलावर चार तरुणींनी खुलेआम बिअर ढोसल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी घडला. वर्दळीच्या या रोडवर हाताता बॉटल घेऊन बिअर पित असताना या तरुणींनी हैदोस घालत प्रचंड धुमाकूळ सुरू केला होता; मात्र सायंकाळी या बेभाण तरुणींची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी बिअर पिणार्‍या चारही तरुणींना ताब्यात घेऊन त्यांना सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते.नेहरू पार्क चौक ते वाशिम बायपास या परिसरात राष्ट्रीय महामार्गावर चार तरु णी गत काही महिन्यांपासून दुचाकी घेऊन फिरत आहेत. या तरुणींचे सौंदर्य आणि राहणीमान लक्षात घेता अनेकांच्या नजरा त्यांच्याकडे वळतात. रोजच राष्ट्रीय महामार्गावर फिरणार्‍या या तरुणींसोबत काही तरुणही असतात; मात्र या तरुणींना काही म्हटल्यास वादाचा विषय होऊ शकतोम्हणून आजपर्यंत त्यांना कुणी हटकले नाही; मात्र या चारही तरुणींनी शुक्रवारी परिसीमा गाठली अन् हातात बिअरच्या बॉटल घेऊन राष्ट्रीय महामार्गावरील निमवाडी पूल आणि पोलीस मुख्यालयाच्या भिंतीला लागून प्रचंड धुडगूस घातला. यथेच्छ मद्य प्राशन करून असलेल्या तरुणींना भान नसल्याने त्यांनी थेट राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध येऊन बिअरच्या बॉटल हातात घेत बिअर प्राशन केली. हा प्रकार येणार्‍या-जाणार्‍यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सदर चारही मद्यधुंद तरुणींची माहिती सिटी कोतवाली पोलीस व दामिनी पथकाला दिली. या दोन्ही पोलिसांनी घटनास्थळ गाठून चारही मद्य प्राशन केलेल्या तरुणींना ताब्यात घेतले. त्यांना पोलीस मुख्यालयामध्ये ठेवले; मात्र या ठिकाणीही त्यांनी धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न केल्याने दामिनी पथकाने त्यांना सिटी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.