शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भरघोस उत्पादन देणार्‍या तेलबियाण्यांची देशात भरमार!

By admin | Updated: June 29, 2014 00:51 IST

भरघोस उत्पादन देणारे तेलबियांचे सात वाण विकसित केले आहेत. देशात असेच अनेक वाण आहेत;

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भरघोस उत्पादन देणारे तेलबियांचे सात वाण विकसित केले आहेत. देशात असेच अनेक वाण आहेत; परंतु किफायतशीर भाव मिळत नसल्याने राज्यातील तेलबिया क्षेत्र व उत्पादन घटले आहे.दरम्यान, केंद्र शासनाने नुकताच साखर आयातीवर ४0 टक्के कर वाढविला आहे. परंतु रिफाईंड खाद्यतेलाच्या आयातीवर केवळ १0 टक्केच आयात कर लावल्याने बाहेरील तेलाची आवक वाढतच आहे. त्यामुळे देशातील तेलबिया वाणाचे भाव पडले असून, त्याचा फटका शेतकर्‍यांना सोसावा लागत आहे.देशातील खाद्यतेलाची गरज भागविण्याकरिता सरकारला विदेशातून खाद्यतेलाची आयात करावी लागत आहे. जवळपास १0२ लाख टनांपेक्षा अधिक ही आयात केली जाते.यात सर्वाधिक पामतेलाचा भरणा असतो.गतवर्षी सरकारने खाद्यतेलाच्या आयातीवर १0 टक्के कर आकारला होता.असे असले तरी खाद्य तेलाच्या आयातीत वाढ झाली आहे. भारतातील तेलबिया वाणाला बाजारभावच नसल्यामुळे शेतकर्‍यांनी तेलबिया वाणाची पेरणी कमी केली आहे.यावर्षी भुईमुगाला किमान चार हजार रुपये क्विंटल भाव अपेक्षित होता; परंतु हे भाव २७00 ते ३000 रु पये प्रतिक्विंटल खाली घसरले,सोयाबीनचे भावदेखील ३५00 रुपये प्रतिक्विंटलच्या खाली आले. या दरात उत्पादन खर्चदेखील निघत नसल्याने शेतकर्‍यांनी तेलबियाचा पेरा कमी केला आहे. विदर्भातील तेलबिया पिकाचा विचार केल्यास सूर्यफुलाचे क्षेत्र १ लाख २५ हजार हेक्टर होते. ते घसरू न ८ हजार हेक्टरवर आले आहे. करडीचे क्षेत्र ८0 हजार हेक्टर होते. तेदेखील १५ हेक्टर खाली आले आहे. खरिपाचा भुईमूग दोन लाख हेक्टरहून झपाट्याने खाली घसरत ६ हजार हेक्टरवर आला आहे. उन्हाळी भुईमुगाचे क्षेत्र ३५ हजार हेक्टर असले तरी हे क्षेत्रदेखील कमी होत चालले आहे.यावर्षी सोयाबीनचा पेरा घटण्याची शक्यता आहे. जगात भारत हा खाद्यतेलाचा प्रमुख आयातदार आहे. या आयातीवर १0 टक्के आयात कर लावल्याने आयात कमी होऊन त्याचा फायदा यावर्षी शेतकर्‍यांना होईल, अशी अपेक्षा तेलबिया शास्त्रज्ञांना होती; परंतु भाव पडल्याने यावर्षीदेखील तेलबियाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता कमीच आहे.