शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

दलित वस्तीच्या निधी वाटपात प्रचंड तफावत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:53 IST

अकोला : दलित वस्ती विकास निधीतील कामांची यादी तयार करताना सत्ताधारी भारिप-बमसंच्या ताब्यात असलेल्या समाजकल्याण विभागाने भाजपच्या ताब्यात असलेल्या तीन जिल्हा परिषद गटांत कोट्यवधी, तर भारिपच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सदस्यांना तीन लाखांपेक्षाही कमी निधी देण्याचे नियोजन केले. हा प्रकार उघड होताच समितीचे सदस्य आक्रमक झाले.

ठळक मुद्देसत्ता भारिपची, कोट्यवधींचा लाभ भाजपला!अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या गटांची परवडमूर्तिजापूर  मतदारसंघावर डोळा

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : दलित वस्ती विकास निधीतील कामांची यादी तयार करताना सत्ताधारी भारिप-बमसंच्या ताब्यात असलेल्या समाजकल्याण विभागाने भाजपच्या ताब्यात असलेल्या तीन जिल्हा परिषद गटांत कोट्यवधी, तर भारिपच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सदस्यांना तीन लाखांपेक्षाही कमी निधी देण्याचे नियोजन केले. हा प्रकार उघड होताच समितीचे सदस्य आक्रमक झाले. जिल्हा परिषद अध्यक्षांकडे तक्रार केल्यानंतर ९ कोटी ६७ लाख रुपयांच्या कामांची यादी स्थगित करण्याचे आदेश त्यांनी दिल्याची माहिती आहे.दलित वस्ती विकास आराखड्यानुसार गावांमध्ये निधी मंजूर केला जातो. त्यासाठी संबंधित सरपंच, ग्रामसेवकांकडून थेट प्रस्ताव आणि अंदाजपत्रके घेऊन निधी वाटपाचे नियोजन झाल्याची चर्चा आहे. त्यामुळेच समाजकल्याण समितीमध्ये मंजुरीसाठी यादी आल्यानंतरच घोळ उघड झाला. मूर्तिजापूर पंचायत समितीमध्ये तब्बल २ कोटी २0 लाख रुपयांच्या कामांची यादी तयार झाली. २२ गावांतील दलित वस्तीच्या नावापुढे निधी देण्यात आला. त्यातही भाजप सदस्याच्या सिरसो गटातच हा निधी देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या एकाच मतदारसंघातील गावांमध्ये एक कोटी रुपयांचे नियोजन आहे, तर सम्राट डोंगरदिवे यांच्या हातगाव मतदारसंघात केवळ तीन लाख असल्याचे यादीतून स्पष्ट होते. अकोला तालुक्यातील ३२ गावांच्या दलित वस्त्यांसाठी २ कोटी १७ लाख रुपये आहेत. विशेष म्हणजे, या तालुक्यात भारिप-बमसंची सदस्य संख्या अल्प आहे. सदस्य सरला मेश्राम यांच्या मतदारसंघातही निधी मिळालेला नाही. त्याउलट इतर मतदारसंघातील अनेक गावांमध्ये निधीचे वाटप मोठय़ा प्रमाणात दर्शविण्यात आले आहे. बाळापूर तालुक्यातील निमकर्दा मतदारसंघावरही अशीच मेहरबानी दाखविण्यात आली. ८0 लाख रुपये या गटातील गावांमध्ये देण्यात आले आहेत. बाश्रीटाकळीतील कान्हेरी सरप गटालाही मोठे झुकते माप देण्यात आले. पातूर तालुक्यातही तोच प्रकार घडला आहे.

अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या गटांची परवडजिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या वाघोडे, उपाध्यक्ष जमिरउल्लाखा पठाण यांच्या गटातील गावांची निधीसाठी परवड होत आहे. उपाध्यक्षांच्या हिवरखेड गाव असलेल्या मतदारसंघातील गावांचे नावही यादीत नाही, तर अध्यक्ष वाघोडे यांच्या देवरी मतदारसंघातील कोणत्या गावांना निधी देण्यात आला, याचा शोध घेण्याची वेळ आली आहे.

मूर्तिजापूर  मतदारसंघावर डोळायेत्या विधानसभा निवडणुकीत मूर्तिजापूर मतदारसंघातून लढण्याची तयारी असलेल्या एका पदाधिकार्‍याने हा निधी पळवून नेल्याची चर्चा आहे. त्याला बळी पडल्याने सिरसो मतदारसंघात एक कोटी रुपये देण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यासाठी मूर्तिजापूर पंचायत समितीच्या एका पदाधिकार्‍याच्या कंत्राटदार पतीचा मोठा हात असल्याचीही चर्चा आहे.