शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी?

By admin | Updated: December 16, 2014 00:53 IST

अकोला मनपा स्थायी समिती सदस्य निवड प्रकरण.

अकोला : मनपातील स्थायी समिती सदस्यांच्या निवडप्रक्रियेच्या प्रकरणाची मंगळवार, १६ डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल. आजवर दोन्ही पक्षांच्यावतीने बाजू मांडण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने यासंदर्भात न्यायालय अंतिम निकाल देते की सुनावणी पुढे ढकलली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. महानगरपालिकेत २0 मार्च २0१२ रोजी १६ सदस्यीय स्थायी समितीचे गठण करण्यात आले होते. निवड झालेल्या स्थायी समिती सभापतीचा कार्यकाळ एक वर्षाचा होता. एक वर्षाचा कालावधी पूर्ण झालेल्या आठ सदस्यांना ईश्‍वरचिठ्ठीद्वारे नवृत्त व्हावे लागले. नव्याने आठ सदस्यांची निवड प्रक्रिया मनपाच्या विशेष सभेत पार पडली. यानंतर सभेत तत्कालीन महापौर ज्योत्स्ना गवई यांनी घेतलेल्या मतदान प्रक्रियेवर आक्षेप नोंदवत, भाजपप्रणीत महानगर सुधार समितीने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. यावर सुनावणी झाली असता, सभागृहातील निवडप्रक्रिया न्यायालयाने रद्द करीत नव्याने आठ सदस्यांची निवड करण्याचे आदेश तत्कालीन महापौर व आयुक्तांना दिले. तथापि, न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न करता, काँग्रेसप्रणीत अकोला विकास आघाडीच्यावतीने काँग्रेस नगरसेवक साजिद खान व राकाँ गटनेता अजय रामटेके यांनी नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी होणार आहे. यावेळी न्यायालय निकाल जाहीर करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.