लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केल्यानंतर मनपा प्रशासनाने अकोलेकरांना सुधारित कर प्रणालीच्या नोटिस जारी केल्या. त्यासंदर्भात नागरिकांना आक्षेप नोंदवण्याची मुदत देण्यात आली असून, पूर्व झोनमध्ये सोमवारपासून सुनावणीला प्रांरभ झाला.मागील १९ वर्षांपासून अकोलेकरांच्या मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन झाले नाही. त्यामुळे मनपाच्या उत्पन्नाला खीळ बसली. शासनानेदेखील जोपर्यंत पुनर्मूल्यांकन करणार नाही तोपर्यंत विकास कामांसाठी निधी देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुषंगाने मनपा आयुक्त अजय लहाने यांनी मालमत्ता पुनर्मूल्यांकनाचा निर्णय घेतला. यामध्ये घरांचे मोजमाप घेण्यात आले. तसेच टॅक्समध्ये ३० टक्के वाढ करण्यात आली. पुनर्मूल्यांकन केल्यानंतर अकोलेकरांना नोटिस जारी करण्यात आल्या असून, त्यावर आक्षेप असल्यास सुनावणीदरम्यान प्रकरण निकाली काढले जात आहे. सोमवारपासून पूर्व झोनमधील मालमत्ताधारकांचे आक्षेप निकाली काढण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी उपायुक्त समाधान सोळंके, नगररचनाकार प्रणय करपे, सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले, जीतकुमार शेजव, कर अधीक्षक विजय पारतवार, आनंद अवशालकर, वसंत मोहोकार, नंदकिशोर उजवणे आदी उपस्थित होते. शनिवारी जठारपेठ बंदची हाक!कर वाढीच्या विरोधात भारिप-बमसंच्यावतीने गटनेत्या अॅड. धनश्री देव यांनी शनिवारी जठारपेठ परिसरात बंदची हाक दिली आहे. मनपाच्या निर्णयाला भारिपचा विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. --
कर प्रणालीच्या आक्षेपावर सुनावणी सुरू
By admin | Updated: May 16, 2017 02:08 IST