शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

अतिरिक्त शिक्षकांच्या हरकतींवर घेतली सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 1:12 AM

अकोला : जिल्हय़ातील शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या  ७१ शिक्षकांच्या समायोजनाचे माध्यमिक शिक्षण विभागाने  नियोजन केले आहे. अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रकाशित  झाल्यानंतर अनेक शिक्षकांनी शिक्षणाधिकार्‍यांकडे हरकती  नोंदविल्या होत्या. त्यानुसार गुरुवारी शिक्षणाधिकारी प्रकाश  मुकुंद यांनी अतिरिक्त शिक्षकांच्या हरकतींवर सुनावणी घेत,  शिक्षकांना बाजू मांडण्याची संधी दिली आणि त्यांचे म्हणणे  ऐकून घेतले. 

ठळक मुद्देलगबग समायोजनाचीशिक्षकांनी शाळा निवडल्यावर समायोजन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ातील शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या  ७१ शिक्षकांच्या समायोजनाचे माध्यमिक शिक्षण विभागाने  नियोजन केले आहे. अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रकाशित  झाल्यानंतर अनेक शिक्षकांनी शिक्षणाधिकार्‍यांकडे हरकती  नोंदविल्या होत्या. त्यानुसार गुरुवारी शिक्षणाधिकारी प्रकाश  मुकुंद यांनी अतिरिक्त शिक्षकांच्या हरकतींवर सुनावणी घेत,  शिक्षकांना बाजू मांडण्याची संधी दिली आणि त्यांचे म्हणणे  ऐकून घेतले. पहिल्या टप्प्यात जिल्हय़ातील ५२ शाळांमधील ७१ शिक्षक  अतिरिक्त ठरले आहेत. या शिक्षकांची यादी  शिक्षणाधिकार्‍यांनी बुधवारी प्रकाशित करून ज्या  शिक्षकांच्या काही हरकती असतील, त्यांनी २१ सप्टेंबरपर्यंंत  हरकती नोंदवाव्यात, यासाठी वेळ दिली होती. त्यानुसार  जिल्हय़ातील अनेक अतिरिक्त शिक्षकांनी हरकती नोंदवून,  त्यांच्यावर शिक्षण संस्थेने अन्याय केला. सेवाज्येष्ठता  डावलून त्यांना अतिरिक्त ठरविले. याबाबत  शिक्षणाधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या. या तक्रारींवर  शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी सुनावणी घेतली आणि  शिक्षकांचे म्हणणे ऐकून घेत ज्यांच्यावर अन्याय झाला,  त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे स्पष्ट  करण्यात आले. सुनावणीनंतर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना पसं तीक्रमानुसार रिक्त पदे असलेल्या शाळा ऑनलाइन  निवडाव्या लागणार आहेत. ९१ रिक्त पदे असलेल्या शाळांची यादी शिक्षणाधिकारी  कार्यालयात लावण्यात आली आहे. या यादीत दिलेल्या  शाळा निवडून शिक्षकांनी ऑनलाइन माहिती भरावयाची  आहे. त्यानंतर शिक्षणाधिकारी यांच्या माध्यमातून अतिरिक्त  शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे. अतिरिक्तच्या  यादीमध्ये नाव आल्यामुळे अनेक शिक्षक नाराज झाले आहे त. त्यामुळे दिलेल्या यादीतून पसंतीची कोणती शाळा  निवडायची, याबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. 

प्राथमिकचे १३ शिक्षक अतिरिक्त जिल्हय़ातील प्राथमिक शाळांमधील १३ शिक्षक अतिरिक्त  ठरले आहेत. प्राथमिक शाळांमध्ये १६ जागा रिक्त आहेत.  या रिक्त जागांवर या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन  करण्यात येणार आहे. प्राथमिक विभागानेसुद्धा अतिरिक्त  शिक्षकांकडून हरकती मागविल्या आहेत. त्यांच्यावर हरक तींवर सुनावणी झाल्यानंतरच अतिरिक्त शिक्षकांच्या  समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.