शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद सभेतील मंजूर ठरावांविरोधातील अपिलावर आज सुनावणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:23 IST

अकोला: आचारसंहिता लागू असल्याच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या २३ जून रोजीच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेल्या विविध ठरावांविरोधात विरोधकांनी दाखल ...

अकोला: आचारसंहिता लागू असल्याच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या २३ जून रोजीच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेल्या विविध ठरावांविरोधात विरोधकांनी दाखल केलेल्या अपिलावर मंगळवार, २४ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणी घेण्यात येणार आहे.

गत २३ जून रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. त्यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी आचारसंहिता लागू असताना जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विविध ठराव मंजूर करण्यात आले. त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याने, सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेल्या विविध ठरावांविरोधात जिल्हा परिषदेतील विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना जिल्हा परिषद सदस्यांच्या वतीने गटनेता गोपाल दातकर व सदस्य डाॅ. प्रशांत अढाऊ यांनी अमरावती विभागीय आयुक्तांकडे धाव घेत अपील दाखल केले होते. या अपिलावर मंगळवार, २४ ऑगस्ट रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात अंतिम सुनावणी होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेतील मंजूर ठरावांविरोधात विरोधकांनी दाखल केलेल्या अपिलावर विभागीय आयुक्तांकडून काय आदेश पारित होतो, याकडे आता जिल्हा परिषद वर्तुळाचे लक्ष लागले आहे.