शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

३७ ग्राम पंचायत सदस्यांची आज सुनावणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 10:52 IST

Grampanchayat News अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात येणार आहे.

अकोला : ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडून आल्यानंतर जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न करणाऱ्या अकोला तालुक्यातील ३७ ग्रामपंचायत सदस्यांची सोमवारी अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात येणार आहे.ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी एक वर्षाच्या कालावधीत संबंधित तहसीलदारांकडे जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. विहित मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाºया सदस्यांना अपात्र ठरविण्याची तरतूद आहे.त्यानुसार २०१७ मध्ये जिल्ह्यात घेण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडून आल्यानंतर विहित मुदतीत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाºया ग्रामपंचायत सदस्यांचा अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाºयांना दिला होता. त्यानुषंगाने विहित कालावधीत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न केलेल्या अकोला तालुक्यातील ८५ ग्रामपंचायत सदस्यांपैकी ४८ सदस्यांची सुनावणी २८ सप्टेंबर रोजी अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयात घेण्यात आली होती. उर्वरित ३७ ग्रामपंचायत सदस्यांची सुनावणी सोमवार, ५ आॅक्टोबर रोजी अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयात घेण्यात येणार आहे.

टॅग्स :Akolaअकोलाgram panchayatग्राम पंचायत