शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य चमू व ग्रामपंचायतींनी समन्वय ठेवून लसीकरणाची गती वाढवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:14 IST

सौरभ कटियार यांनी बुधवारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले यांच्यासह उगवा आणि घुसर येथील उपकेंद्रांमधील कोरोना लसीकरण ...

सौरभ कटियार यांनी बुधवारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले यांच्यासह उगवा आणि घुसर येथील उपकेंद्रांमधील कोरोना लसीकरण सत्राला भेट देऊन पाहणी केली व आवश्यक त्या सूचना केल्या.

आगर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उगवा उपकेंद्रामधील आरोग्य चमूने सकाळी सात वाजताच लसीकरण सत्र सुरू करून ११० लाभार्थ्यांना लस दिली. या सत्राचे एकंदरीत नियोजन पाहून सौरभ कटियार यांनी आरोग्य चमू तसेच ग्रामपंचायतीचे कौतुक केले. यापुढेही असाच समन्वय ठेवून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लस देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. आपातापा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत घुसर उपकेंद्र येथेही कटियार आणि डॉ. आसोले यांनी भेट दिली. यावेळी उपकेंद्रामध्ये जागा अपुरी पडत असल्याने लसीकरण सत्र उपकेंद्रात न ठेवता गावातील शाळेमध्ये ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या. लसीकरण मोहीम दीर्घकाळ चालू राहणार असल्याने आणि आरोग्य यंत्रणा सातत्याने काम करीत आहे, हे पाहता, लसीकरण सत्राला मनुष्यबळ अपुरे पडत असल्याचे पाहून गावनिहाय शिक्षकांना लसीकरण सत्राची जबाबदारी देण्याची संकल्पनाही कटियार यांनी यावेळी मांडली. ग्रामपंचायत, महसूल, शिक्षण तसेच इतर विभागाचे सहकार्य असेल, तर लसीकरणाची गती वाढविली जाऊ शकते आणि जिल्हा लसीकरणात अव्वल राहू शकतो, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जगदीश बनसोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन गावंडे, सीएचओ डॉ. खान, डॉ. पाटील, डॉ. हागे उपस्थित होते, तसेच उगवा आणि घुसर येथील सरपंच उपस्थित होते, असे जिल्हा माध्यम विस्तार अधिकारी प्रकाश गवळी यांनी कळविले आहे.