ह्यडीएचओंह्णनी घेतली बैठक : कायद्याचे पालन करण्याचे निर्देश अकोला : मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असतानाही, काही घटकांकडून या प्रयत्नांना छेद देण्याचा प्रयत्न होत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. स्त्री भ्रूणहत्या व गर्भलिंग निदान रोखण्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सरसावला असून, याबाबतच्या कायद्यांचे कठोर पालन व्हावे, अशा सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार यांनी तालुका आरोग्य अधिकार्यांना तातडीने आयोजित केलेल्या बैठकीत दिल्या. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत आरोग्य सहायकास गर्भपाताच्या गोळय़ा विकताना पकडण्यात आल्याच्या पृष्ठभूमीवर डॉ. पवार यांनी सर्व तालुका आरोग्य अधिकार्यांची बैठक बोलावली. या बैठकीत आकोट, बाश्रीटाकळी, तेल्हारा, मूर्तिजापूर व पातूर येथील तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. पवार यांनी ग्रामीण भागातील सर्व सरकारी व खासगी आरोग्य संस्थांमध्ये सर्व औषधी साठय़ाची नोंद अद्ययावत करण्यात यावी. गर्भपाताकरिता आवश्यक असणार्या औषधांची वैद्यकीय अधिकार्यांनी पडताळणी करावी, संशयित बाबींची माहिती त्वरित जिल्हा आरोग्य अधिकार्यांना कळवावी, अशा सूचना दिल्या. आरोग्य विभागातील आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी यांनी शासकीय नोकरी व्यतिरिक्त कोणताही खासगी वैद्यकीय व्यवसाय करून नये. वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी खासगी व्यवसाय करीत असल्यास तालुका आरोग्य अधिकार्यांनी त्याबाबतची माहिती जिल्हा स्तरावर कळवावी, असे निर्देशही डॉ. पवार यांनी यावेळी दिले. (प्रतिनिधी) तालुका आरोग्य अधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली समिती जिल्हय़ात अनधिकृत खासगी रुग्णालये, दवाखाने यांची धडक शोध मोहीम सुरू आहे. यासाठी ग्रामीण भागाकरिता तालुका आरोग्य अधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीद्वारे धडक मोहीम राबविल्या जात आहे. तक्रारीसाठी टोल फ्री नंबर जिल्हय़ात कोठेही गर्भलिंग निदान चाचणी किंवा गर्भपात केले जात असतील, तर त्याबाबतची माहिती १८00२३३४४७५ या टोल फ्री किंवा ९४२00४४४७५ या क्रमांकावर कळवावी. तसेच ह्यडब्लूडब्ल्यूडब्ल्यू डॉट आमची मुलगी डॉट जीओव्ही डॉट इनह्ण या संकेतस्थळावर कळवावी, असे आवाहन डॉ. हरी पवार यांनी केले आहे.
स्त्री भ्रूणहत्या, गर्भलिंग निदान रोखण्याकरिता आरोग्य विभाग सरसावला
By admin | Updated: March 29, 2017 20:30 IST