शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापक पदाच्या लालसेने भरली झोळी!

By admin | Updated: February 9, 2016 02:22 IST

मनपा शिक्षकांजवळून उकळली अग्रीम रक्कम

आशीष गावंडे / अकोला: मुख्याध्यापक पदाच्या लालसेपायी महापालिकेच्या १४ शिक्षकांनी प्रामाणिकता गहाण ठेवत शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांच्या झोळीत पैशांचे दान टाकले. आर्थिक गैरव्यवहाराचा डाग लागलेल्या या विभागाने बदनामीची तमा न बाळगता संबंधित शिक्षकांजवळून चक्क अग्रीम रक्कम उकळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाने गोरगरीब विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी आजपर्यंत कोणते प्रयत्न केले, हा संशोधनाचा विषय आहे. २00६-0७ पासून शिक्षण विभागात सुरू असलेली घोटाळ्य़ांची मालिका आजही कायम असल्याचे दिसून येते. विषय तज्ज्ञांच्या नियमबाह्य नियुक्तीचे प्रकरण राज्यभर गाजले होते. याप्रकरणी प्रामाणिकतेचा आव आणणार्‍या अधिकार्‍यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल झाले. हा प्रकार कमी म्हणून की काय, सर्व शिक्षा अभियानमार्फत वर्ग खोल्यांच्या बांधकामातील भ्रष्टाचार असो वा अपंग समावेशित विद्यार्थ्यांच्या साहित्य वाटपातील घोळ, या सर्व प्रकरणांमुळे शिक्षण विभाग सतत प्रकाशझोतात राहिला. शिक्षण विभागाच्या कामकाजात सुधारणा होईल, ही अपेक्षा असतानाच जून २0१५ मध्ये खिचडीच्या कंत्राट वाटपात ९ लाखांचा गैरव्यवहार झाला. हा वाद शमत नाही तोच आता शिक्षकांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्यासाठी मोठा आर्थिक व्यवहार पार पडल्याची माहिती आहे. या प्रक्रियेत काही शिक्षक संघटनांच्या पदाधिकार्‍यांचा सक्रिय सहभाग असून, पदाधिकार्‍यांच्या माध्यमातूनच इच्छुक १४ शिक्षकांची यादी तयार झाली. मुख्याध्यापक पद मिळाल्यास आपसूकच नियमानुसार वेतनवाढ होणार असल्याने पदोन्नतीच्या बदल्यात एक ते सव्वा लाख रुपयांचा दर ठरल्याची माहिती आहे. यातील काही रक्कम अग्रीमच्या नावाखाली शिक्षण विभागापर्यंत पोहोचवण्यात आली. शिक्षण विभागाच्या या प्रतापामुळे पुन्हा एकदा महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.