शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालयी राहण्याच्या नियमाची पायमल्ली

By admin | Updated: May 28, 2014 22:17 IST

आदेशाला केराची टोपली दाखवून शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी, डॉक्टर, ग्रामसेवक, शिक्षक, कृषी सहायक, तलाठी हे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडली आहेत.

बाळापूर : राज्य शासनाच्या आदेशानुसार शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी, डॉक्टर, ग्रामसेवक, शिक्षक, कृषी सहायक, तलाठी यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश आहेत; मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवून हे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडली आहेत. अनेक प्रा. आ. केंद्रांचे वैद्यकीय अधिकारीसुद्धा मुख्यालयी राहत नसल्याची धक्कादायक माहिती आहे. मुख्यालयी राहत असल्याचे दाखवून भाडे वसुलीत मात्र हे कर्मचारी मागे नाहीत. तालुक्यातील पारस, वाडेगाव, हातरुण, निमकर्दा, उरळ, गायगाव, रिधोरा, तामशी, नकाशी, अंदुरा ही गावे मोठी असून, या ठिकाणी शासकीय कर्मचारी मुख्यालयी असणे गरजेचे आहे. गावाच्या विकासाच्या किंवा आरोग्याच्या दृष्टिकोनातून ग्रामीण जनतेला विशेष माहिती नसते. शासन व गाव यांच्यातील मुख्य दुवा ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहायक, शिक्षक, तलाठी, डॉक्टर आहे. त्यामुळे सदर कर्मचारी व अधिकारी मुख्यालयात राहणे आवश्यक आहे. शासकीय सेवेमध्ये रुजू होताना मुख्यालयात राहण्याची अट असते. त्यासाठी त्यांना विविध सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. तसेच मुख्यालयी राहण्याचा भत्तासुद्धा दिला जातो; परंतु या आदेशाला न जुमानता गरजेनुसार राहणे व मुख्यालयी राहण्याचे कर्तव्य समजून न घेता आपल्या मर्जीप्रमाणे शासकीय कर्मचारी वागत आहेत. अकोला जिल्हा परिषद प्रशासनाने काही महिन्याआधी तालुक्यातील कर्मचार्‍यांचा आढावा घेतला होता. यानंतर मात्र ही मोहीम थंडावली. ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी, कृषी सहायक, तलाठी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहणे आवश्यक आहे; मात्र तालुक्यातील कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. बहुतांश कर्मचारी अकोल्यातून अप-डाऊन करतात. या कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवणारे अधिकारीसुद्धा अप-डाऊन करीत असल्याने कर्मचार्‍यांवर कोणाचाही वचक नसल्याचे दिसत आहे.