शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

फॅक्टरीतून घातक वायुगळती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2016 02:26 IST

रॅलीज इंडियातील प्रकार, दुर्गंधीने अकोलेकर हैराण.

सचिन राऊत / अकोला: अकोल्याच्या औद्योगिक वसाहतीतील रॅलीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड फॅक्टरीमध्ये डायमीथोट या घातक रसायनाची वायुगळती शुक्रवारी सुरू झाली. सायंकाळी ही वायुगळती रोखण्यात आली; मात्र तोपर्यंत झालेल्या वायुगळतीने अकोलेकरांना प्रचंड दुर्गंधीचा सामना तीन दिवस करावा लागणार आहे.अकोल्याच्या औद्योगिक वसाहतीतील तिसर्‍या फेजमधील रॅलीज इंडिया फॅक्टरीमध्ये कीटकनाशक तसेच रासायनिक खतासाठी लागणारे रसायन तयार करण्यात येते. फॅक्टरीमध्ये शुक्रवारी दुपारी डायमीथोट या घन स्वरूपातील रसायनाचे द्रव रूपांतर करण्याची प्रक्रिया सुरु होती. या प्रक्रियेसोबतच हे रासायनीक द्रव्य बाटलीबंद करण्याचे कामही फॅक्टरीत सुरू होते; मात्र ही प्रक्रिया सुरु असताना तांत्रिक चुक घडल्याने अचानक वायुगळती सुरू होऊन प्रचंड प्रमाणात धूर बाहेर पडण्यास सुरूवात झाली. कंपनीच्या अधिकार्‍यांनी या प्रकाराची माहिती मनपाच्या अग्निशमण विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाला तत्काळ दिली. अग्निशमन विभागाने पाण्याचे दोन बंब या फॅक्टरीसमोर तैनात केले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोन क्षेत्र अधिकार्‍यांनी फॅक्टरीची तपासणी सुरु केली. फॅक्टरीच्या अधिकार्‍यांनी ही प्रक्रिया तत्काळ थांबवली; मात्र उग्र दुर्गंधी पसरल्याने या ठिकाणी काम करणे कठीण झाले. मनुष्यासोबतच प्राण्यांसाठीही घातक असलेली ही वायुगळती सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास थांबली; मात्र तोपर्यंत या वायुगळतीची दुर्गंधी शहरात तसेच फॅक्टरीच्या १५ किलोमीटर परिसरातील खेड्यांमध्ये पसरल्याने खळबळ उडाली होती. आणखी तीन दिवस ही उग्र दुर्गंधी अशाच प्रकारे राहणार असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.