अकोला : पातूर रोडवरील चिखलगाव परिसरात एका हरिणाच्या पिल्लाचे काही कुत्रे लचके तोडत असताना काही सामाजिक कार्यकर्त्यांंनी शनिवारी या हरिणाच्या पिल्लाचे प्राण वाचविले. हरिणाच्या पिल्लाचे काही कुत्रे लचके तोडत असल्याचे मुकुंद गायकवाड व विठ्ठल वाघ यांना दिसले. त्यांनी तातडीने हरिणाच्या पिल्लाकडे धाव घेऊन या पिल्लाला कुत्र्याच्या तावडीतून सोडले. त्यानंतर अकोला येथे आणून हरिणाच्या पिल्लावर उपचार केले. सायंकाळच्या सुमारास हरिणाचे पिल्लू वन विभागाच्या अधिकार्यांकडे देण्यात आले.
हरिणाच्या पिल्लाला मिळाले जीवनदान
By admin | Updated: June 15, 2014 22:22 IST