शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

हरभरा घोटाळा : ८0 केंद्र संचालकांची सुनावणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 02:09 IST

अकोला : हरभरा बियाणे घोटाळ्य़ात नोटीस बजावलेल्या १४0 पैकी ८0 कृषी केंद्र संचालकांच्या सुनावण्या बुधवारपर्यंत आटोपल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एच.जी.ममदे यांनी दिली. याप्रकरणी घोटाळेबाजांवर तातडीने कारवाई होण्यासाठी उर्वरित संचालकांनी सुनावणी जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, जिल्हा परिषद सदस्य नितीन देशमुख यांनी कृषी विकास अधिकार्‍यांच्या भेटीदरम्यान केली. 

ठळक मुद्देसुनावणी जलदगतीने घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : हरभरा बियाणे घोटाळ्य़ात नोटीस बजावलेल्या १४0 पैकी ८0 कृषी केंद्र संचालकांच्या सुनावण्या बुधवारपर्यंत आटोपल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एच.जी.ममदे यांनी दिली. याप्रकरणी घोटाळेबाजांवर तातडीने कारवाई होण्यासाठी उर्वरित संचालकांनी सुनावणी जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, जिल्हा परिषद सदस्य नितीन देशमुख यांनी कृषी विकास अधिकार्‍यांच्या भेटीदरम्यान केली. गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत हरभरा बियाणे अनुदानावर देण्यात आले. त्याचा लाभ पात्र शेतकर्‍यांना न मिळता ते महाबीजचे वितरक, दलालांनी मध्येच लाटला. त्यासाठी बोगस शेतकर्‍यांच्या नावे ते वाटप झाल्याचे पुरावेही गोळा केले. तेच पुरावे प्रतिज्ञापत्रावर लेखी स्वरूपात घेत जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकार्‍यांना सादर केले जात आहेत. विशेष म्हणजे, शासनाच्या कृषी विभागाच्या सहायकांपासून ते उप-संचालक स्तरापर्यंतच्या अधिकार्‍यांनी केलेल्या चौकशीत त्या शेतकर्‍यांनी बियाणे घेतले नसल्याचे सांगितले. आता त्यापैकी अनेक शेतकर्‍यांचे प्रतिज्ञापत्र घेऊन त्यांनी उचल केल्याचा बनाव अनेक कृषी केंद्र संचालकांनी केला आहे. त्यामुळे तो आधार घेत केंद्र संचालकांना वाचवण्याचा घाट घातला जाऊ शकतो, याची माहिती घेण्यासाठी बुधवारी देशमुख यांनी कृषी विकास अधिकारी ममदे यांच्याकडे धाव घेतली. हरभरा घोटाळ्य़ातील संबंधितांची सुनावणी याच गतीने सुरू राहिल्यास ती वर्षभरही पूर्ण होणार नाही. तसे झाल्यास कारवाई कधी होणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सुनावणी जलद गतीने पूर्ण करून तत्काळ कारवाई करण्याची मागणी देशमुख यांनी रेटली.