शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

हर्र बोला.. चा गजर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 01:25 IST

अकोट : श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी शहरातून वाजतगाजत भव्य कावडयात्रा काढण्यात आली. या कावड यात्रेमध्ये २२ शिवभक्त मंडळांचा सहभाग होता. उत्सवात मोठय़ा संख्येने शिवभक्त सहभागी झाले होते. शिवभक्तांनी कावडीद्वारे आणलेल्या जलाने बहुतांश मंडळांनी तपेश्‍वरी मंदिरातील शिवलिंगाला, तर काहींनी श्री नंदिकेश्‍वराला जलाभिषेक केला. 

ठळक मुद्देतपेश्‍वरी, नंदिकेश्‍वर मंदिरात शिवभक्तांनी केला जलाभिषेकसामाजिक संघटनांकडून स्वागत 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी शहरातून वाजतगाजत भव्य कावडयात्रा काढण्यात आली. या कावड यात्रेमध्ये २२ शिवभक्त मंडळांचा सहभाग होता. उत्सवात मोठय़ा संख्येने शिवभक्त सहभागी झाले होते. शिवभक्तांनी कावडीद्वारे आणलेल्या जलाने बहुतांश मंडळांनी तपेश्‍वरी मंदिरातील शिवलिंगाला, तर काहींनी श्री नंदिकेश्‍वराला जलाभिषेक केला. श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी (१४ ऑगस्ट) गांधीग्राम येथून  पूर्णा नदीचे जल घेऊन आलेल्या शिवभक्तांची कावड यात्रा स्थानिक अकोला नाका येथून सकाळच्या सुमारास प्रारंभ झाली.  कावड यात्रेतील पालखींवर शिवभक्त मंडळांद्वारे आकर्षक सजावट केली होती. अनेक कावडांवर भगवान शंकर, नंदी, श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान व गजानन महाराज आदींच्या आकर्षक मूर्तींची आरास करण्यात आली होती. त्यांचे ठिकठिकाणी महिला-पुरुष भाविकांनी  पूजन करून दर्शन घेतले. अनेक शिवभक्त मंडळांनी सामाजिक विषयांवर संदेश देणारे देखावे तयार करून जनजागृती केली. काही मंडळांनी मल्लखांबावरील चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केलीत. यावेळी पारंपरिक ढोलताशे, बँड पथक आदींचा मिरवणुकीत सहभाग दिसून आला. श्रावणमास कावड उत्सवात  गणपती मंदिर मंडळ, पंचमुखी शिवभक्त मंडळ यात्रा चौक, शिवभक्त मंडळ शनवारा ग्रुप,  तपेश्‍वरी कावड मंडळ भवानीपुरा, जय भवानी क्रीडा मंडळ रामटेकपुरा, श्रावणबाळ कावड मंडळ बारगण,  जयशक्ती  शिवभक्त मंडळ दखनी फैल, नव हिंद ग्रुप यात्रा चौक, नंदिकेश्‍वर मंडळ नंदिपेठ, क्रांती ग्रुप महात्मा सोमवार वेस, जय भोले डोहरपुरा, नाथुबाबा मंडळ टाकपुरा, भयानक शिवभक्त मंडळ कुंभारवाडी, वीरसंग्राम मंडळ,  छावा शिवभक्त मंडळ, जय ग्वाला ग्रुप, वीर लहुजी बारगण, वीर शिवभक्त कावड मंडळ, जय महारुद्र शिवभक्त मंडळ, शिवशक्ती  मंडळ शनवारा,  मोरया शिवभक्त मंडळ गोवारीपुरा, जय गजानन कावड मंडळ गजानननगर आदी मंडळ सहभागी झाले होते. भगवान महादेवावर रचित गीतांवर तरुणांचा उत्साह ओसंडून वाहत होता. शहरातील शिवाजी चौक, सोनू चौक, यात्रा चौक, कालंका चौक, सावरकर चौक मार्गे सोमवार वेस, मोठे बारगण, गोलबाजार, सराफ बाजार मार्गे सायंकाळदरम्यान श्री तपेश्‍वरी मंदिर, तर काही मंडळांनी नंदिकेश्‍वर मंदिरातील शिवलिंगाला जलाभिषेक केला.