शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

हर्र ऽऽऽ बोला महादेव!

By admin | Updated: August 26, 2014 21:57 IST

शिवभक्तीत न्हाऊन निघाली राजेश्‍वर नगरी

अकोला : खांद्यावर पाणी भरलेल्या कावडी, शिवशंकराची पालखी, १७ कि.मी. चा पायी प्रवास, तरीदेखील चेहर्‍यावर उत्साह कायम. ढोल-ताशे व अत्याधुनिक डिजेचे संगीत व त्यावर थिरकणारे युवा शिवभक्त. गुलाल आणि फुलांची उधळण, यामध्ये न्हाऊन निघालेले शिवभक्त अशा उत्साहपूर्ण वातावरणात सोमवारी अकोला शहराचा सर्वात मोठा लोकोत्सव साजरा झाला. भक्ती आणि श्रद्धा यांचा अपूर्व संगम दर्शविणार्‍या या उत्सवामुळे संपूर्ण अकोला नगराला यात्रेचे स्वरूप आले होते. शेकडो पालख्या व कावडधारी लहान-मोठे मंडळे या उत्सवात सहभागी झाले होते. यामध्ये आकर्षणाचे केंद्र ठरली ती डाबकीरोडवासी शिवभक्त मंडळाची ४५१ हंडे व २0१ भोपळे लावलेली पालखी. अकोला शहराचे आराध्य दैवत राजराजेश्‍वर मंदिरात दरवर्षी मोठय़ा प्रमाणात श्रावण उत्सव साजरा केला जातो. श्रावणातील दर सोमवारी शिवभक्त श्रद्धापूर्वक जलाभिषेक करतात. श्रावणातील शेवटच्या सोमवारी १७ कि.मी. अंतरावर असलेल्या गांधीग्राम (वाघोली) येथून पूर्णा नदीचे पाणी कावडीने आणून राजेश्‍वराला जलाभिषेक केला जातो. सहा दशकापेक्षा अधिक काळाची परंपरा असलेल्या या कावड उत्सवात अकोलेकरांचा भरभरून सहभाग असतो. यावर्षी ३00 च्या वर लहान-मोठी पालखी मंडळे व ५00 च्या वर कावडधारी या उत्सवात सहभागी झाले होते. गांधीग्राम येथून पायी शिवभक्त खांद्यावर शिवशंकराची पालखी व कावड घेऊन आले. वल्लभनगर, उगवा फाटा, शिलोडा, आकोट फैल, रेल्वे पुलावरून शिवाजी पार्क, राजकमल चौक, गवळीपुरा, आकोट स्टँड, माळीपुरा चौक, उदय टॉकीज, जुना कापड बाजार, सराफा बाजार, दाणा बाजार, गांधी चौक, गांधी मार्ग, सिटी कोतवाली चौक, लोहा पूल, जय हिंद चौक मार्गे या सर्व पालख्या व कावडी राजेश्‍वर मंदिरात पोहोचल्या. पहिल्या क्रमांकावर असलेल्या मानाच्या राजेश्‍वर संस्थानची पालखी ठीक सकाळी ९.३0 वाजता राजेश्‍वर मंदिरात पोहोचली. ही पालखी वाहून आणणार्‍या शिवभक्तांनी राजेश्‍वराला जलाभिषेक केल्यानंतर एक-एक करीत सर्वच मंडळांनी पूर्णेच्या पवित्र जलाने राजेश्‍वराला अभिषेक केला. रात्री उशिरापर्यंत अभिषेक सुरू होता. कावड व पालखी घेऊन आलेल्या शिवभक्तांनी श्रद्धापूर्वक राजेश्‍वराचे दर्शन घेतले व जलाभिषेक केला. कावड घेऊन येणार्‍या शिवभक्तांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. अनेक सामाजिक व धार्मिक संस्थांनी शिवभक्तांना चहा, फराळ व भोजनाचे वाटप केले. राजकीय पुढार्‍यांनीदेखील ठिकठिकाणी पालखी व कावडधार्‍यांचे स्वागत केले.