शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक स्थळावर हातोडा; आयुक्त अंधारात!

By admin | Updated: May 19, 2017 01:18 IST

अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांचा प्रताप

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील मुख्य रस्त्यालगतचे धार्मिक स्थळ पाडण्यासंदर्भात मनपा आयुक्तांच्या स्तरावर वेळोवेळी बैठक घेऊन निर्देश दिले जातात. मागील काही दिवसांमध्ये पश्चिम आणि उत्तर झोनमध्ये धार्मिक स्थळांवर केलेल्या कारवाईपासून खुद्द महापालिका आयुक्त अजय लहाने अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. अतिक्रमण विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांची हिंमत पाहता कोठेतरी पाणी मुरत असल्याच्या शंकेला वाव आला आहे. याप्रकरणी महापालिका आयुक्त अजय लहाने काय निर्णय घेतात, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, महापालिका प्रशासनाने २९ सप्टेंबर २००९ पर्यंत नियमबाह्यरीत्या खुल्या जागांवर उभारलेली धार्मिक स्थळे व त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मुख्य मार्गालगतच्या धार्मिक स्थळांना हटविणे अपेक्षित होते. मनपा आयुक्त अजय लहाने यांच्या सूचनेनुसार पहिल्या टप्प्यात ५४ धार्मिक स्थळांची यादी तयार करण्यात येऊन संबंधित स्थळे हटविण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात वाहतुकीला अडथळा होणाऱ्या व मुख्य रस्त्यालगतच्या २२२ धार्मिक स्थळांची यादी तयार करण्यात आली.महापालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शहरात मुख्य रस्त्यांचे निर्माण कार्य सुरू करण्यात आले. मुख्य रस्त्यांना अडथळा ठरणाऱ्या धार्मिक स्थळांना हटविण्याचे आयुक्त लहाने यांनी नगररचना विभाग आणि अतिक्रमण विभागाला आदेश दिले. धार्मिक स्थळे हटविण्यापूर्वी मनपा आयुक्तांच्या स्तरावर बैठक आयोजित करून संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना निर्देश दिले जातात; परंतु मागील काही दिवसांमध्ये प्रामुख्याने पश्चिम आणि उत्तर झोनमध्ये मनपा आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय धार्मिक स्थळांवर जेसीबी चालविण्यात आल्याचा प्रताप नगररचना विभाग आणि अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांनी केल्याचे समोर आले आहे. आयुक्तांच्या आदेशाशिवाय कारवाई कशी?शहरातील पश्चिम व उत्तर झोनमध्ये मुख्य रस्त्यांप्रमाणेच प्रभागातील अंतर्गत भागातील धार्मिक स्थळेदेखील उद्ध्वस्त करण्यात आल्याचे समोर आले आहे. जुने शहरातील डाबकी रोड परिसरातील गोंडपुरा भागात जाऊन मंदिरांची नासधूस करण्यात आली. सदर कारवाई करताना आयुक्तांचे आदेश नसल्याची माहिती आहे. मनपाच्या जागेवरील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष का?शहराच्या कानाकोपऱ्यात महापालिकेच्या मालकीच्या जागा आहेत. संबंधित जागांवर झेंडे, पूज्यनीय व्यक्तींच्या नावाचे फलक लावून अतिक्रमण थाटण्यात आले आहे. संबंधित अतिक्रमणाकडे मनपा प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. यासंदर्भात मनपा आयुक्त लहाने ठोस भूमिका घेणार का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.