शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयाच्या कामात हलगर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:26 IST

अकोला: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत डिसेंबरपर्यंत गावे  हगणदरीमुक्त करावयाची असताना जिल्हय़ातील निवड  झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये कोणतीच कामे न झाल्याने नऊ  ग्रामसेवकांना निलंबित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी  अधिकारी एस. रामामूर्ती यांनी मंगळवारी दिले. एकाच वेळी ही  कारवाई झाल्याने ग्रामसेवक बिथरले आहेत. 

ठळक मुद्देनऊ ग्रामसेवक निलंबितएप्रिलपासून गावांमध्ये कामेच केली नाहीत!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत डिसेंबरपर्यंत गावे  हगणदरीमुक्त करावयाची असताना जिल्हय़ातील निवड  झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये कोणतीच कामे न झाल्याने नऊ  ग्रामसेवकांना निलंबित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी  अधिकारी एस. रामामूर्ती यांनी मंगळवारी दिले. एकाच वेळी ही  कारवाई झाल्याने ग्रामसेवक बिथरले आहेत. जिल्हय़ातील ग्रामीण विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी  कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची  जबाबदारी ग्रामसेवकांवर आहे. त्यामध्ये विशेषत: घरकुल  योजना व स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका  अभियान, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरीला  होणारा विलंब, आमचं गाव, आमचा विकास, आपले सरकार  सेवा केंद्र, सेवा हमी कायदा, नरेगा, जलयुक्त शिवार, धडक  सिंचन विहीर योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने गावे  विकासापासून वंचित आहेत. त्यातच स्वच्छ भारत मिशन अंतर्ग त संपूर्ण तालुके ३0 डिसेंबरपर्यंत हगणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्ट  आहे; मात्र त्यातील शौचालयांची कामे सुरूच न करणार्‍या  ग्रामसेवकांच्या निलंबनाचा प्रस्ताव पंचायत विभागाने मुख्य  कार्यकारी अधिकार्‍यांकडे सादर केला. त्यावर मंगळवारी  स्वाक्षरी झाल्याने नऊ ग्रामसेवकांना निलंबनाचे आदेश देण्यात  आले. 

निलंबित झालेले ग्रामसेवकनिलंबित झालेल्यांमध्ये चार ग्रामविकास अधिकारी आहेत.  त्यामध्ये वाडेगाव येथील एस.व्ही. डोंगरे, हातरूण येथील  पी.एन. जामोदे, बेलखेड येथील ए.एन. उंबरकर, भटोरी येथील  पंकज गुजर यांचा समावेश आहे. ग्रामसेवकांमध्ये टाकळी  खोजबोळचे व्ही.आर. अंधारे, सौंदळाचे जी.एस. भुस्कुटे,  आडसूळचे जी.एस. गवळी, तेल्हारा तालुक्यातील खंडाळाचे  एस.बी. काकड, बाळापूर पंचायत समितीतील ए.एम. शिंदे यांचा  समावेश आहे. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान