शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

दीड लाखावर शेतक-यांना पीक विम्याच्या निम्मी मदत!

By admin | Updated: August 2, 2016 01:53 IST

पीक विमा न काढलेले शेतकरी: ६0 कोटींचा प्रस्ताव.

संतोष येलकर / अकोलागतवर्षी पीक विमा न काढलेल्या जिल्ह्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक १ लाख ७३ हजार शेतकर्‍यांना पीक विमा रकमेच्या निम्मी (५0 टक्के) मदत मिळणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील पीक विमा न काढलेल्या अशा शेतकर्‍यांच्या मदतीसाठी ६0 कोटी ३७ लाख ६२ हजार ६५८ रुपये निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तयार करण्यात आला आहे.गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला होता. या पृष्ठभूमीवर पीक विमा न काढलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना पीक विमा रकमेच्या ५0 टक्के मदत देण्याचा निर्णय राज्य शासनामार्फत गत २ मार्च रोजी घेण्यात आला. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यात तहसील कार्यालयांमार्फत गतवर्षीच्या खरीप हंगामात पीक काढलेल्या आणि पीक विमा न काढलेले शेतकरी आणि पेरेपत्रकानुसार शेतकर्‍यांच्या पिकाचे क्षेत्र यासंबंधीची माहिती घेऊन अहवाल तयार करण्यात आले. तहसीलदारांमार्फत प्राप्त अहवालाच्या आधारे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत यासंबंधी जिल्ह्याचा अहवाल तयार करण्यात आला. त्यानुसार गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ६१ हजार १0२ शेतकर्‍यांनी १ लाख ४८ हजार ७२0 हेक्टर ९ आर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचा विमा काढला नसून, १२ हजार ७८९ शेतकर्‍यांनी ३३ हजार २८८ हेक्टर ३ आर क्षेत्रावरील कापूस पिकाचा विमा काढला नाही. जिल्ह्यातील एकूण १ लाख ७३ हजार ८९१ शेतकर्‍यांनी सोयाबीन व कापूस पिकाचा विमा काढला नसून, पीक विमा न काढलेल्या शेतकर्‍यांना पीक विमा रकमेच्या ५0 टक्के मदतीसाठी ६0 कोटी ३७ लाख ६२ हजार ६५८ रुपये निधी मागणीचा प्रस्ताव दोन दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. शासनाच्या मंजुरीनंतर जिल्ह्यातील पीक विमा न काढलेल्या कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना पीक विमा रकमेच्या ५0 टक्के मदत मिळणार आहे.