शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाखाची बनावट दारू जप्त

By admin | Updated: September 23, 2014 00:07 IST

तिघांना अटक : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

खामगाव : विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर खामगाव तालुक्यातील चितोडा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आज, २२ सप्टेंबर रोजी छापा टाकला असता १ लाख ६९ हजारांची बनावट दारू पकडण्यात आली. यावेळी तीन आरोपींना अटक केली आहे.विधानसभेत दारुचा वाढता वापर होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाचे सक्त आदेश आहेत. या आदेशानुसार होणार्‍या विक्रीबाबत निवडणूक कक्षाला १ सप्टेंबरपासूनच माहिती देण्यात येत आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणात दारु विक्रीवर आळा बसला आहे. परिणामी, राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली बनावट दारु बाळगणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आज २१ सप्टेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्क बुलडाणा विभागाचे अधीक्षक डी.जी.माळी यांच्या मार्गदर्शनात व्ही.एम.पाटील दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क खामगाव व एन.के.मावळे दुय्यम निरीक्षक शेगाव, जवान सर्वश्री अमोल सोळंके, नवृत्ती तिडके, गणेश मोरे, मोहन जाधव यांनी मिळालेल्या माहितीनुसार चितोडा ता. खामगाव शिवारातील शेख गफ्फार शेख गफूर यांचे शेतामध्ये दारुबंदी गुन्ह्याकामी छापा टाकला असता महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेली व महाराष्ट्र राज्याचा महसूल बुडवून आणलेल्या बनावट विदेशी दारुच्या १८0 मिलीच्या १0५६ शिश्या तसेच एक मोटारसायकल आढळून आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बनावट विदेशी दारू तसेच मोटारसायकल असा एक लाख ६९ हजार २00 रुपयांचा माल जप्त केला; तसेच आरोपी शे.सत्तार शे.गफ्फार (वय ३५), शे.जब्बार शे.गफ्फार (वय ३२), सै.अश्पाक अली मुमताज अली (वय १८) सर्व रा.चितोडा ता.खामगाव या तिघांविरुद्ध म.दा.का.१९४९ चे कलम ६५ क, ड ८३, १0८ नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. हा प्रकार उजेडात आल्याने असे बनावट मद्य विक्रीस आणणारे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील तपास व्ही.एम.पाटील दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क खामगाव व सहकारी करीत आहेत.