शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात गारपीट, अवकाळी पाऊस; पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 10:43 IST

Hailstorm, unseasonal rains in Akola district ही भागात हलक्या स्वरूपाची गारपीट झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

ठळक मुद्दे बार्शिटाकळी, बाळापूर, मुर्तिजापूर आणि पातुर तालुक्यात नुकसान झाले.कृषी विभागाकडून सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली.

अकोला : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून वादळवाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पिकांना तडाखा बसला. शनिवारी अकोला शहरासह बार्शिटाकळी आणि बाळापूर तालुक्यात वादळवाऱ्यासह पाऊस झाला, तर काही भागात हलक्या स्वरूपाची गारपीट झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अकोला शहरासह जिल्ह्यातील काही भागात शुक्रवारी सायंकाळी वादळवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यापावसात मुर्तिजापूर तालुक्यातील भाजीपाला, कांदा आणि उन्हाळी तीळ पिकाचे नुकसान झाले, तर इतर तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पिकांना फटका बसला. शनिवारीदेखील सायंकाळच्या सुमारास अकोला शहरासह मुर्तिजापूर, बार्शिटाकळी, पातूर आणि बाळापूर तालुक्यात वादळवाऱ्यासह दमदार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, बार्शिटाकळी आणि बाळापूर तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाल्याचेही निदर्शनास आले. अकोला शहरातही काही भागात गारपीट झाल्याचे दिसून आले. अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने शेतकऱ्यांवर नवे संकट ओढवले आहे. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे पिकांचे किती प्रमाणात नुकसान झाले, याचे कृषी विभागाकडून सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली.

 

मुर्तिजापूरात ७.३ हेक्टरवर नुकसान

शुक्रवारी झालेल्या वादळी पावसामुळे मुर्तिजापूर तालुक्यात ७.३ हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामध्ये कांदा, उन्हाळी तीळ आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. शनिवारीदेखील अवकाळी पावसामुळे तालुक्यातील इतरही भागात पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले.

डाबकी येथे वीज पडून बैलाचा मृत्यू

शुक्रवारी वादळवाऱ्यासह झालेल्या पावसानंतर शुक्रवारी रात्री उशिरा डाबकी परिसरात वीज पडून एका बैलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

 

बार्शिटाकळी आणि बाळापूर तालुक्यात गारपीट

जिल्ह्यातील बार्शिटाकळी आणि बाळापूर तालुक्यात शनिवारी अवकाळी पावसासोबतच गारपीटही झाली. बाळापूर तालुक्यातील वाडेगावात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. कृषी विभागाच्या सर्वेक्षणानंतरच नुकसानाचा आकडा समोर येणार आहे.

 

शुक्रवारी झालेल्या पावसात मुर्तिजापूर तालुक्यात ७.३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये भाजीपाला, कांदा आणि तीळ पिकांचा समावेश आहे. शनिवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे किती नुकसान झाले हे सर्वेक्षणानंतरच समोर येईल.

- डॉ. के.बी. खोत, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीHailstormगारपीट