मेहकर (जि. बुलडाणा) : मेहकर, लोणार व सिंदखेडराजा या तालुक्यांमध्ये १0 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास अनेक ठिकाणी वादळी वार्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला, तर लोणार तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये गारपिटीने कांदा बियाण्याचे नुकसान झाले आहे. मेहकर तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी वार्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली, तर लोणार तालुक्यातील शारा, वडगाव तेजन शिवारात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला. या गारपिटीने तालुक्यातील शेतकर्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा, सोनोशी व वरदडी परिसरात वादळी वार्यासह गारांचा पाऊस झाला. वादळी वार्यासह झालेल्या गारपिटीने अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेली, तर शेतशिवारातील भाजीपाला व कांदा बियाणे पिकासह आंब्याचेही मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. कोपलेला निसर्ग शेतकर्यांच्या पाठीशी लागला आहे.
लोणार तालुक्यात गारपीट
By admin | Updated: April 10, 2015 23:37 IST