शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कालवाडीमध्ये ज्ञानबा-तुकारामाचा गजर

By admin | Updated: March 16, 2017 02:44 IST

तुकाराम बीजेला कालवाडी श्रीक्षेत्री भाविकांची गर्दी

अकोट, दि. १५- तालुक्यातील वर्‍हाडची देहू म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्रीक्षेत्र कालवाडी येथे १४ मार्च रोजी संत तुकाराम बीज सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला.गुरुमाउली संत वासुदेव महाराज यांच्या प्रेरणेने उभारलेल्या जगतगुरु संतशिरोमणी श्री तुकाराम महाराज मंदिरात तुकाराम बीज सप्ताह पार पडला. फाल्गुन वद्य बीजेला या छोट्याशा गावात पंढरपूर व देहू अवतरल्याचा अनुभव आला. ह्यपुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामह्णच्या घोषाने सारा आसमंत दुमदुमून गेला. वीणा, टाळ, मृदंगांच्या स्वरात अभंग गात भाविक भक्तीरंगात न्हाऊन गेले होते. पालखी सोहळा व गाथा दिंडी नगरप्रदक्षिणेचा भक्ती सोहळा डोळ्याचे पारणे फेडून गेला. पालखीचे घरोघरी श्रद्धा व भक्तीने भावपूर्ण पूजन करण्यात आले. ह.भ.प. महाराजांनी भक्तीरंगाची उधळण केली. अनंत महाराज हिंगणकर यांनी पालखीचे पूजन केले .दरम्यान, बीजेला पहाटे संत मंदिरात रितेश सुधाकर हिंगणकर यांच्या हस्ते संताभिषेक व महाआरती पार पडली. पूजेचे पौराहित्य मोहन महाराज रेळे यांनी केले. कालवाडी येथील संत तुकाराम बीजोत्सवाची सांगता ज्ञानेश प्रसाद पाटील यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. या कीर्तनात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज वारकर्‍यांचे प्राणाहून प्रिय आहेत. त्यांनी वेदांत शास्रांचे ब्रम्हज्ञान सामान्य लोकांपयर्ंत पोहोचविले. जनउद्धारासाठी त्यांनी अवतार घेतला. भक्ती ज्ञानाचा जीवन मार्ग प्रशस्त केला.भक्ती व ज्ञान वैराग्याचे ते मूर्तिमंत संत होते, असे भावोद्गार ज्ञानेश प्रसाद पाटील यांनी काढले. संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमनाच्या अभंगातून तुकोबांचा खरा इतिहास विषद केला. संत तुकाराम महाराज यांचे पहिले मंदिर कालवाडीला उभारले गेले, ही अलौकिक घटना आहे. ही गुरुवर्य महाराज यांची कृपा आहे. वै.पंजाबराव हिंगणकर यांनी श्रद्धासागर व तुकोबाचे मंदिर अशा दोन तीर्थस्थळांचे निर्माण कार्य करून त्यांनी गुरुसेवा केली, असे सांगून त्यांच्या पावन स्मृतिंना उजाळा दिला.भक्तीसोहळ्याला सहकार्य करणारे महाराज, श्रद्धासागरचे विश्‍वस्त व देणगीदारांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सचिन हिंगणकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या आयोजनात अनंत महाराज हिंगणकर यांच्या नेतृत्वात युवकांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठय़ा संख्येने भाविक उपस्थित होते. तद्नंतर महाप्रसादाने या भक्तीसोहळ्याची सांगता झाली. श्रीक्षेत्र दीपोत्सवाने उजळले!संत तुकाराम बीजेच्या पूर्वसंध्येला तुकोबा या पुण्यभूमीत साक्षात अवतरतात, या भावनेने कालवाडीचे ग्रामस्थ भक्तीरंगात न्हाऊन निघाले. भाविकांनी भक्तीरंगाची उधळण करीत दीपोत्सव साजरा केला. घरोघरी सडासारवण, रांगोळी व पताकांनी ही संतवाडी फुलून गेली होती. ह्यसाधूसंत येती घरा तोचि सण दिवाळी दसराह्ण याचा अनुभव आला. टाळ, मृदंगाच्या स्वरात ज्ञानोबा-तुकारामाच्या गजराने ही भूमी दुमदुमून गेली होती. घरोघरी तोरणे दिवे, लावत दीपोत्सवात हे गाव उजळून गेले होते. दरम्यान, देवीदास महाराजांचा (चोखोबांचे) भक्तीभावपूर्ण स्वागत सोहळा पार पडला. त्यांचे हरिकीर्तन पार पडले.