शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मेडशी परिसरातून पाच लाखांचा गुटखा जप्त

By admin | Updated: December 28, 2014 01:08 IST

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; लखन खंडेलवाल व आशीष काबरा अटकेत; दोन फरार.

अकोला : वाशिम जिल्ह्यातून मेडशी व पातूरच्या घाटातून चोरट्या मार्गाने अकोल्यात येत असलेला पाच लाखांचा गुटख्याचा साठा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी छापेमारी करीत पकडला. मेडशी परिसरातील जय हनुमान ढाब्यानजीक असलेल्या एका गोदामातून हा गुटखा जप्त करण्यात आला तसेच दोन गुटखा माफियांना अटक करण्यात आली. दोघे फरार होण्यात यशस्वी झाले असून, त्यांच्यावर मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अकोला जिल्ह्यात गुटखाविक्री जोमात सुरू असून, त्याचा बाजार पुन्हा फोफावला असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने शनिवारी प्रकाशित करताच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांनी शनिवारी मालेगाव व मेडशी परिसरातील गोदामांवर छापेमारी करीत हनुमान ढाब्यानजीक असलेल्या एका गोदामातून पाच लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. गुटखा माफिया लखन खंडेलवाल (रा. मेडशी) व आशीष काबरा (रा. अकोला) या दोघांचा हा माल असून, त्यांच्याविरुद्ध मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांनी गोदामांसोबतच ट्रक, खासगी बस आणि एसटी बसची तपासणी केल्यानंतर एका गोदामातून पाच लाख रुपयांचा हा गुटखा जप्त करण्यात यश मिळवले. हनुमान ढाब्यानजीक असलेल्या या गोदामात रात्रीच्या अंधारात दिवसाआड ट्रकने गुटखा साठविण्यात येत असल्याची माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त एस. एम. कोलते यांनी आपल्या अधिकार्‍यांना कारवाईसाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले हो्रते. यावरून इतर तपासण्या मागे ठेवून गुटख्याची शोधमोहीम अधिकार्‍यांनी राबविली असून, पहिल्याच दिवशी एका गोदामातून पाच लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये सुगंधी सुपारी, विमल पान मसाला, विमल गुटखा, पानबहार गुटखा व पान मसाला जप्त करण्यात आला.