शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बंद गोदामातून ४0 लाखांचा गुटखा जप्त

By admin | Updated: June 1, 2016 01:15 IST

अकोल्यातील औद्योगिक वसाहतीमधील घटना.

अकोला: जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने अकोल्यातील औद्योगिक वसाहतीमधील एका बंद गोदामावर मंगळवारी छापा टाकून, सुमारे ४0 लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त केला. जिल्हय़ातील बहुतांश पोलीस स्टेशनचे लागेबांधे आणि अधिकार्‍यांच्या पाठराखणीतून मोठय़ा प्रमाणात गुटख्याची विक्री सुरू असल्याचे या कारवाईनंतर उघड झाले. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील फेज क्रमांक ४ मध्ये पंकज राऊत यांचे गोदाम आहे. हे गोदाम अनेक दिवसांपासून बंद असल्याने कुणाच्याही यावर संशय नव्हता; मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाचे प्रमुख सचिन जाधव यांना गुटखा साठय़ाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मंगळवारी या गोदामावर छापा घातला. त्यांनी गोदामातून सुमारे ४0 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. पंकज राऊतच्या गोदामात असलेला हा गुटखा साठा कुणाचा आहे, हे स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी राऊत यांच्याशी संपर्क साधला असता, ते बाहेरगावी असल्याने गुटख्या साठय़ाचा मालक उजेडात आला नाही; मात्र राऊत हे बुधवारी अकोल्यात येणार असून त्यानंतर पोलीस त्यांची चौकशी करणार आहेत. त्यांच्या चौकशीतून गोदाम कुणाला भाड्याने दिले आहे, गुटखा कुणाच्या मालकीचा आहे, हे स्पष्ट होणार आहे. एमआयडीसी पोलिसांच्या नाकाखाली टिच्चून एवढय़ा मोठय़ा प्रमाणात गुटख्याची उलाढाल सुरू असताना पोलीस काय करीत आहेत, असा सवाल विशेष पथकाच्या कारवाईनंतर समोर आला आहे. पोलिसांच्या हप्तेखोरीमुळे गुटखा माफियांचे चांगलेच फावले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाचे प्रमुख सचिन जाधव, रामेश्‍वर गिरी, शैलेष घुगे, उदय शुक्ला, अनिल राठोड व नीलेश यांनी केली. गुटख्याचा साठा अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त एस. एम. कोलते व अन्न निरीक्षक रावसाहेब वाकडे यांच्या ताब्यात देण्यात आला असून, त्यांची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.