शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

विझोरा येथे जुगारावर छापा, १0 जणांना अटक

By admin | Updated: January 28, 2015 01:02 IST

तीन शिक्षकांचा समावेश; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त.

विझोरा (बार्शिटाकळी, जि. अकोला): पोलीस अधीक्षकांच्या विशेष भरारी पथकाने २६ जानेवारीच्या सायंकाळी, एका स्थानिक महाविद्यालयानजीक असलेल्या एका घरावर धाड घालून, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांसह एकूण दहा जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास, येथील एका कनिष्ठ महाविद्यालयातील काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी इतर काही जणांसोबत, महाविद्यालयानजीकच असलेल्या एका घरात जुगार खेळत होते. पोलिसांना ही माहिती मिळाल्यावरून, जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने, छापा घातला आणि एकूण दहा जणांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून रोख १४,४८0 रुपये, तसेच ३0 हजार रुपये किमतीचे नऊ मोबाइल संच, तसेच तीन लाख रुपये किमतीची दोन चारचाकी वाहने, असा एकूण तीन लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी बाश्रीटाकळी पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्याच्या कलम १२ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.